पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. करणांत भिनलेला आहे, ही गोष्ट लक्षात आणल्याने खरोखर भारी समाधान वाटते. सहानुभूति, प्रेम, एकजूट, ही त्या प्रसंगी चाललेल्या सर्व प्रकारांची मुख्य प्रेरक तत्त्वे होती. सायंकाळी प्रारंभालाच लॉर्ड किन्नेयर्ड यांनी क्याप्टन बॉइड कारपेन्टर यांचे या सम्मेलनाच्या योजनेबद्दल व व्यवस्थेबद्दल गोड शब्दांनी अभिनंदनपूर्वक आभार मानले. शहानशहाच्या समुद्रपारच्या राज्यांच्या अभिवृद्धीविषयींचा ' टोस्ट ' किंवा सहपान, याच्या पूर्वी, दि राइट ऑनरेबल जे. एच्. क्यांपबेल्ल, के. सी., एम्. पी., यांनी भाषण केलें. त्याला सर पीटर स्टूअर्ट बाम यांनी दुजोरा दिल्यानंतर अवचित मला तत्स्वीकारप्रदर्शक भाषण करण्याला सांगण्यांत आले. इंग्लंडांत आपलें प्रथमचेच भाषण करण्याचा योग्य प्रसंग निवडण्याची मला संधि मिळती, तर ती याहून अधिक चांगली अशी मला खचित निवडतां आली नसती. हे एक त-हेचे दिव्यच होते. मी त्याला तयारही नव्हतो. तरी पण माझें भाषण ऐकण्यांत मंडळीने जी आतुरता व मान्यता दाखविली, आणि ते पुरे झाल्यावर मजवर जी अभिनंदनाची वृष्टि झाली, तिने माझ्या त्या दिव्याची पुर्ती भरपाई झाली. त्या भाषणांत मी झटले, 'मला या प्रचंड ब्रिटिश साम्राज्याचा एक प्रजाजन होतां आले आहे, याबद्दल मला मोठा अभिमान वाटत आहे. तरी पण आपला देश सोडून बाहेर पडेपर्यंत, याचे खरें महत्त्व व रहस्य, यांची योग्य जाणीव मला