पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. यजमान व यजमानीण ही दोघेही आनंदवृत्तीची असल्याने त्यांना असा समारंभ करण्याची जी एकदां सुखदायक प्रेरणा झाली तेव्हांपासून अलीकडे हा समारंभ लंडन येथें सीझनमध्ये अवश्य होणाऱ्या अनेक सामाजिक समारंभांमध्ये अद्वितीय व मनावर पक्का ठसणारा होतो. पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्याही शहरामध्ये एतत्तुल्य प्रसंग क्वचितच दृष्टीस पडण्याजोगा आहे. भूमंडळाच्या सर्व भागांत पसरलेल्या ग्रेट ब्रिटनच्या वसाहती व त्यांच्यावर अवलंबून असलेले प्रदेश, यांतील सुप्रसिद्ध व थोर प्रतिनिधी त्या स्थळी एकत्र जमलेले होते; आणि एकमेकांशी स्नेहभावाने वागणाऱ्या अशा त्या जंगी समाजामध्ये मी मोकळेपणी मिसळून त्यांची ती कळकळीची व स्वदेशाभिमानाने ओथंबलेली भाषणे ऐकत होतो. त्यावेळी मला टेनिसनच्या एका अमर कवनांतील पुढील भाषांतररूपाने दिलेल्या ओळींमध्ये व्यक्त झालेल्या मनोवृत्तीची यथार्थ उमज पडली. ब्रिटन्स मोठ्या मोठ्या आवाजाने म्हणतात, 'हे पुत्रांनो, तुही सारे एकून एक. एकजीव व्हा, व एकसाम्राज्यघटक व्हा. तुमचे अंतःकरण, तुमचा जीवात्मा, ब्रिटनशी एकरूप असू द्या. तुमचे एकच जीवन, एकच ध्वज, एकच आरमार व सिंहासन राहील, असे व्हा.' मातृभूत भूमि आणि तिचे दूरवर फेंकले गेलेले राज्यभाग, परस्परनिबद्ध करणारा स्नेहपाश किती दृढ व अंतः ७७