पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ आरती श्री अण्णासाहेब यांची. जयदेवा योगेश्वरा | विनायका गुरुवरा ॥ आरती ओवाळीतो। प्रेमाच्या माहेरा ॥ धृ० ॥ लोपला वेदमार्ग । लया ब्राह्मण्य गेलें ॥ सोडुनी स्वाभिमान | परवुद्धि झाले जन ॥ १ ॥ हीन दीन दशा आली । दुजी आशाच नुरली ॥ देवाच्या कृपेंवीण | दैवहीनां नुमजें तें ॥ २ ॥ ●जाणुनी पुण्यग्रामी। महाराष्ट्र पुण्यभूमी ॥ ब्राह्मण्य मूर्तिमंत | दावियेले आचरोनी गायत्रीमंतराज | व्यक्त दाखवीलें बीज ॥ जीव हा विश्वकांय । स्वयं ब्रह्माचे केवळ ॥ ४ ॥ परमात्मा गुरुमूर्ति । नरसिंहसरस्वती ॥ सच्छिष्य रहाटीनें। प्रार्थिलें जन्मवरीं ॥ ५ ॥ सकळां अंतर्यामी । पूर्ण प्रगट व्हावें ॥ हीनता सर्व जावीं । इहपर मुक्तीसी द्यावें ॥ ६ ॥