Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ आरती श्रीबुवासाहेबांची. आरती नारायणा । करूं मंगलवामा ॥ सद्गुरुनाम साजे । किति वर्णु मी महिमा ॥ धृ० ॥ माया तव अनिवार । भ्रांतिं पडले अंध नर ॥ सन्मार्ग बोधिताही । मोह पाशी गुंतवीते ॥ १ ॥ सगुणाचनीं निर्गुणप्राप्ति | गुरु ब्रह्मा नव्हे परती || . वेदादि वर्णितीं जें । तुझ्या कृपें उमजें तें ॥ २ ॥ अखंड नामोच्चार | गीतगोविंद मधुर ॥ धन्य जे रस पीती । चुकविती येरझार ॥ ३ ॥ भाविका भक्तिमार्ग | बोधिला तूं सुगम ॥ सर्वांभूती अन्नदान | दावियेलें भक्तिवर्म ॥ ४ ॥ श्रीनरसिंहसरस्वती । व्यापी सर्वत्न जगतीं ॥ प्रत्यया आणिले तें । ब्रह्मानंदीं लीन होती ॥ ५ ॥ आदिष्ट गुरुकार्य । करुनी अवतार | संपवी पद्मनाभ । अंतीं होई गुरुरूप ॥ ६ ॥ 0