Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनुष्य म्हणजे काय ? १५१ व सुंदर असले, तरी तें हृदयांत शिरून मूळ धरीत नाहीं. ही स्थिति घाल- विण्याचा मार्ग हा एवढाच आहे. बाहेरच्या शिक्षणानें हें काम होणार नाहीं. नुसत्या ' राष्ट्रीय शिक्षणानें' हें काम घडणार नाहीं. ( वर मनुष्य या दृष्टीनें वाढ, • मनुष्य या दृष्टीने किंमत, ' वगैरे शब्द फार ठिकाणी आले आहेत. त्याचें थोडें निश्चित स्पष्टीकरण करणे जरूर आहे;... म्हणजे ' राष्ट्रीय शिक्षण ' म्हणून हल्लीं ज्याला म्हणतात, त्यानें हें काम कसे घडणार नाहीं, तें लक्षांत येईल. घटकावयवांची परिणती म्हणजेच वस्तूची वाढ. मनुष्यशरीरांत मुख्य घटक दोन; - एक पांचभौतिक शरीर; याची परिणती अन्नपानादिकांच्या योगानें होते, व तें प्रकृतिस्थ असले म्हणजे त्याला ● वागविणान्या आंतील अपार्थिव शक्ति व्यक्त होतात; हा दुसरा मुख्य घटक. दुष्काळ, दारिद्र्य, रोग, जीवनकलह अपथ्य-शिक्षण-पद्धति, आणि व्यसना- धीनता वगैरे अनेक गोष्टींनी आमची शरीरें पूर्ण वाढत नाहीत, ही गोष्ट तर सिद्धच आहे. शारीरिक हास झाला आहे व होत आहे, या विषयी दोन मतेंच नाहींत. उलट मानववंशदृष्टया आम्हीं नामशेष होणार, अशी निराशा वाट ण्यापर्यंत कित्येकांची मजल गेलेली आहे. ही स्थिति सुधारण्याचे इलाजही चालू आहेत, परंतु ते सारे संहत स्वरूपाचे असल्यामुळे, व्हावे तशा रीतीनें परि- णामकारक होत नाहीत. पिंडतःच जीवनक्रम निराळा आणि आखाड्यांत कसरत करावयाची तास दीड तास ! तरी पण या बाजूस जर जास्त लक्ष लागू लागले आहे, हें मात्र खरें; आणि जर केवळ कसरतीवरच शरीराची दाढ अवलंबून असती, तर हें दैन्य लवकरच दूर झालें असतें. पण तसें नसल्यानें उत्तरोत्तर निराशाच होते. अंतःशक्ती मनुष्यांत कितीही असल्या, तरी त्याचे प्रकार मुख्य तीनच आहेत. ज्ञानशक्ती, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति. बाह्य अवयवांची वाढ परस्परांशी समप्रमाण झाली असतां, ते जसे परस्पर- साहाय्यकारक होऊन मूर्ती ही सुदृढ, बलवान् आणि सुंदर होते, नाहीं तर तींत व्यंग येतें, तशीच या अंतरावयवांचाही गोष्ट असते. मनुष्याचे हे तीनहीं अंतर्घटक परस्परांस प्रेरक, पोषक आणि साहाय्यक होतील अशा रीतीनें त्यांची वाढ झाली, तरच या जड यंत्राच्या आंतील खऱ्या मनुष्याची वाढ पूर्ण झाली, असे म्हणतां येईल. नाहीतर तो देह लंगड्यालुल्याप्रमाणे जरी प्रत्यक्ष दिसत नसला, तरी अपंगच म्हटला पाहिजे. ह्या गोष्टीच्या अज्ञाना-