१५० उपसंहार. 6 सुंदर आडनांवांनी जी अनिर्बंधता जिकडे तिकडे बोकाळली आहे, तिच्यामुळे जरी एक प्रकारचा 'स्पिरिट ( 1 ) -- यथार्थतेनें म्हणावयाचें म्हणजे एक प्रकारचा उल्लूपणा ' उत्पन्न झालेला दिसतो, तरी याच घरघेण्या रांडेनें दांभिकता, निःसत्त्वता, वंचकता, स्वार्थैकता वगैरे अनेक घातुक रोगांची ठाणीं राष्ट्रशरी- रांत वसवून, त्याची दशा करून सोडली आहे. सर्व आपत्तींचें मूळ येथेच आहे. आस्तिक असां, की नास्तिक असो, राष्ट्रदृष्टया पहा, की व्यक्तिदृष्टया पहा, मनुष्य या नात्यानें तुम्हांला स्वतःच्या व्यक्तीची पूर्ण वाढ करून घेतली पाहिजे. ही जबाबदारी तुमचवर आहे. ही गोष्ट ओळखली पाहिजे, तद- नुरूप साक्षेप केला पाहिजे. कोणर्चाही संहत स्वरूपाची चळवळ हल्ह्रीं पोसत नाहीं, याचें कारण हेंच आहे कीं, तरवार पेलण्याचें सामर्थ्यच खरोखर घटक अंतःकरणांत नसतें. राष्ट्रपरमाणूंचा मगदूर व्यक्तिशः वाढल्याखेरीज त्यांनी घडविलेली घटना जिवट कशी होईल ? पाऊण शतकाच्या सर्व व्यापांत ही गोष्ट आम्ही विसरून गेलों. अनेक तऱ्हेच्या राष्ट्रीय चळवळी करणारा वीर, ' स्वतःची वाढ खासगी रीतीनें अव्याहत केली पाहिजे, ' ही गोष्ट भुलून गेला. म. गांधी राष्ट्राला वळण लावण्याची धडपड करीत असतां, स्वतःची पूर्ण वाढ व्हावी म्हणून रात्रंदिवस कसरत करितात, हीच गोष्ट त्यांचा भगत नेमकी विसरून जातो ! पुढाऱ्यांनी ही स्वयंसिद्धतेची घमेंड टाकून दिली पाहिजे, व स्वतःचें व अनुयायांचें खासगी आयुष्य विशिष्ट शिस्तीत घालून घेतले पाहिजे. विद्यालयांत खरोखर राष्ट्र तयार होत नसतें. आईबापांच्या घरांत, चुलबोळक्यांच्या व विटीदांडूच्या सहवासांतच ते तयार होतें. तयार झालेल्या लोकांना आवश्यक तो माल मात्र या विद्यालयांत पुरविला जातो. राष्ट्र शिक्षकाची जागा राष्ट्रीय कॉलेजांतील खुर्चीवर नाहीं. गृहस्वामिनीच्या कानांतील डुलाप्रमाणे गृहलक्ष्मीला भूषविणाऱ्या पाळण्याजवळच ती असली पाहिजे. हे म्हणणे अतिशयोक्तीचें वाटेल, पण तें शब्दश: खरें आहे. तात्पर्य इतकेच की, संहत प्रयत्न पुष्कळ झाले व ते होतीलही. त्यांना खंड पड ण्याची भीतीच नको. ते करणाऱ्यांची मोठीशी वाण पडत नाही. परंतु त्यांना यश यावें म्हणून ज्यांना वाटत असेल, त्यांनी तरी व्यक्तिदृष्टया स्वतःची वाढ होईल, व तसें वळण दुसन्यास लागेल, असा प्रयत्न करण्यास तयार झाले पाहिजे. 'प्रोपागांडा ' कितीही मनोहर व मुद्देसूद असला, तत्त्व केवढेही उच्च
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६३
Appearance