पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

० १५२ उपसंहार. मुळे कोणच्याही प्रस्तुत शिक्षणपद्धतींतच व्यंग उत्पन्न झाले आहे. तेथें त्या शिक्षण पद्धतींतून उत्पन्न झालेले जीवही सव्यंगच निपजतील, यांत नवल ते काय ? वर सांगितल्याप्रमाणे पालकांच्या बेजबाबदार आयुःक्रमामुळें, घरींदारीं, मुलांस अशा तऱ्हेनें सहज मिळणारें शिक्षण बंद झाले. सरकारनें शिक्षणखातें काढलें. त्या चरकांतून पोराला काढले की काम झाले, अशी एक समजूत पाल- कांची, व मुलांची, दोघांचीही होऊन बसली | साराच सवता सुभा झाला. ज्यांनी शिक्षणखात्याची योजना केली ती माणसें जास्त शहाणीं होती यांत कांही शंका नाही. त्यांनी त्या खात्याचें नांवच मुळी Department of Public Instruction म्हणजे सर्व प्रकारच्या माहितीचें खातें असें ठेविलें आहे ! या शिक्षणखात्यांतल्या शिक्षणानें, फार तर कांही विषयांचें थोडेफार ज्ञान, ( माहिती - instuction, ) विद्यार्थ्याला प्राप्त होतें इच्छा- शक्ति व क्रियाशक्ति यांच्या वाढीकडे लक्ष देणें हें अर्थातच, मुळी त्याचें कर्तव्यच नाहीं, ध्येयच नाहीं. ज्या शिक्षणयंत्रांतून आजची वेंधळी पिढी बाहेर पडली, आणि ज्या शिक्षणाच्या नांवानें एवढी ओरड करण्यांत येते, त्या शिक्षणयंत्रांतूनच रानडे, टिळक, गोखले, शास्त्रीबुवा, गांधी वगैरेंची पिढी चाहेर पडली. एकाच शिक्ष- णाचा भिन्न भिन्न पिढ्यांवर असा निरनिराळ्या तऱ्हेचा परिणाम कां व्हावा ? याचे कारण पहातां असे दिसतें कीं, माणसाचें कौटुंबिक जीवन, व व्यक्तिशः रहाणी यांच्यांत या निरनिराळ्या पिढ्यांत मोठें अंतर पडलें. टिळक, आगरकर यांची पालक पिढी पूर्वी म्हटल्याप्रमाणें वेजबाबदार बनली नव्हती; आणि जुनाट का होईना, पण कोणत्या तरी शास्त्रीय पद्धतीनें बसविलेल्या परंपरा तिनें राखून ठेविल्या होत्या. त्यांचा फायदा घेऊन वर सांगितल्याप्रमाणें शक्ति- त्रयांनी निदान अपंग तरी न होतां ही पिढी Instruction घ्यावयास बसली, त्यामुळे अपाय फारसा न होतां त्यांना कुमारीलभट्टी करितां आली. जसजशी ही स्थिती नाहींशी झाली व जुनी नाही आणि नवीही नाही अशी अशास्त्रीय व एक तर विचारहीनतेनें उडाणटप्पूपणाची अथवा विचारशक्ती असल्यास बेजबा- बदारपणानें सोईस पडेल तशी लवचीक राहणी सुरू झाली, तसतशी नवीन पिढी अंतरींद्रियांनी दुर्बल, अपंग, निशा घेतल्याप्रमाणे धुंद, अथवा जागृत झालेल्या निशाबाजाप्रमाणे 'गळून गेलेली निपजली. यावरून एक गोष्ट दिसून