Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आस्तिकत्व व दुवळेपणा एके ठिकाणी असणे शक्य नाहीं. १४९ व्हावी असे नुसतें वाटतें, तिचें वीं कर्मक्षेत्रांत कोणीं ना कोणी तरी पेरले पाहिजे, म्हणजे यथाकाल तिचें शेत पिकतें. तुला व्हावीसें वाटतें ना ? तर मग तुझ्यावरच ती करण्याची जबाबदारी आहे; करावयास लाग ! " त्यांनीं स्वतः तेंच केलें. लोकांस धर्माची व तपाची गरज आहे याची त्यांना एक दिवस जाणीव झाली. लागलीच त्यांनी स्वतःचें जीवनच धर्मरूप होईल, अशा उग्र तपस्येला आरंभ केला ! त्यांना कोणाची वाट पाहिली नाहीं. जें जें त्यांना सुचलें तें तें करण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. ते कोणाशीं वादविवाद करीत बसले नाहीत. मनुष्य या नात्याने ते आधींच पूर्णपणें परिणत झालेले होते, म्हणून त्यांना अडथळे बाजूस सारून प्रयत्न करतां आले. तुम्हीं नास्तिक माणूस असाल, तर तुम्हांला त्यांचें सांगणे आहे की " बाबारे, माझ्या दशांश तरी परिश्रम करून, मग नास्तिक होण्याची तुझ्यावर जबाबदारी आहे. आ स्तिक म्हणवीत असून दुर्बल म्हणवीत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. कारण आस्तिकत्व आणि दुबळेपणा एकल असणे शक्यच नाहीं ! तुम्ही फस- लेले आहां. वास्तविक तुम्ही नास्तिकच आहां; इतकेंच की नकळत तुम्हीं आस्तिकपणाच्या शोधांत आहां. ही अर्धवट स्थिति टाकून देऊन या शोधाचे मागें तुम्हांस कंबर कसून लागले पाहिजे. कारण यानें तुमची सारी कार्ये होतील. परंतु मनुष्य या नात्यानें तुमची वाढ झालेली नाहीं; तेव्हां आधीं माणूस होण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. देव आहे, हा मीं अनुभव घेतला आहे. तुम्ही जर तो पदरांत आयता पाडून घ्याल, तर सर्व जबाबदारीची जाणीव तुम्हांस होऊन तुमचे अंगांत शक्ती येईल, व तुमचा लवकर कार्यभाग होईल. 'कोणचा मार्ग?" म्हणून चिंता करून कालक्षेप करूं नका. जें जें त्या करितां सुचेल, तें अवंचकपणानें प्रत्यक्ष कृतीत आणा, म्हणजे आपोआप सारें जुळेल. मी कोठें कोणास विचारीत बसलों ? " पूर्वीच्या विवेचनावरून एक गोष्ट लक्षांत येईल कीं, कोणत्या तरी एका टोंकास ध्येय समजून तें साध्य केल्याखेरीज, अगर त्याची खटपट केल्या- खेरीज माणसाच्या इच्छाशक्तीची वाढ होत नाहीं; आणि अशा तऱ्हेची जबाबदारी बाळगली असतां, तिच्याकरितां जे परिश्रम आपण करितों, अथवा जीं नियंत्रणें स्वतःस घालून घेत असतो, त्यांनीच दौर्बल्य जाऊन अंतःशक्तीची वाढ होते. आजकाल ' व्यक्तिस्वातंत्र्य ' ' मतस्वातंत्र्य ' ' मतीदार्य ' वगैरे 6