पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ उपसंहार. असेल, तर ती स्वतःबरोवरच लुप्त होऊं नये व त्याची परंपरा टिकावी, असे यत्न केले आहेत कां ? मी मोठ्या मोठ्या गोष्टींविषयीं तर म्हणतच नाहीं, पण साधी, अगदी सांसारिक गोष्ट म्हणजे 'माझ्यापेक्षां माझ्या मुलानें कांही तरी गुणसंपत्तीनें जास्त व्हावें' एवढा तरी अट्टाहास कोणी केला आहे कां ? येऊन जाऊन आकांक्षा काय ती एकच, कोर्णाकडून तरी शक्य तितकी जास्त डिग्री त्यानें मिळवावी ! वा रे ध्येय ! जे प्रयत्नवादी नसतील, व भगवंतावर भार घालून राहण्याचा टेंभा मिरवीत असतील, त्यांनीही 'भक्त या नात्यानें भगवं- ताला अखंड प्रार्थना करण्याचे कर्तव्य केले आहे कां ? ' म्हणून अंतःकरणास पुसावें. समाधानकारक उत्तर येणें केवळ अशक्य आहे. कारण तसे नसतें तर कोणत्याही चळवळी मरून न जातां पोसल्या असत्या. सारांश काय, को खरोखर नास्तिकपणानें चार दिवस धुडगूस घालणारा, जगांतील उडाणटप्पू रहिवाशी एक प्रकारें पुष्कळ पुरवला; परंतु देव आहे असे तर म्हणावयाचें, 'परंतु त्या संबंधाने जबाबदारी तर कांहींच बाळगावयाची नाही, हा लफंगेपणा सर्वांत वाईट. यानें जो अधःपात होतो, व जी दुर्बलता येते, तिला तोडच नाही. हेच सांप्रत आमच्या नशीबी आले आहे. यावर असे मनांत येतें कीं, 'असी ऐसा प्रसंग झाला । झाला तो होऊन गेला ॥ ' पण आतां तरी याला काय करावें ? सर्व तऱ्हेचे प्रयत्न चालूच आहेत कोणीच कोंभ धरीत नाहीं, त्याला काय करावें ? ' हें जर सुधारणे शक्य नसेल, तर मग या कटकटींत तरी कां पडा ? आला दिवस पार पडून जावें; " पिछे जो होय सो होय ! " एकटा मी काय करणार ? पण श्रीअण्णासाहेब म्हणतात की " नाहीं रे बाबा ! तुझ्या बुद्धीत जे स्फुरतें तें होतां होईल तों पूर्णपणे बाहेर आणण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. कारण तूं स्वतःला आस्तिक म्हणवतोस. जेथून तुझें अडत असेल तेथूनच प्रारंभ कर, कोणाची वाट पाहूं नको. एक पळ उशीर लावूं नको कीं, वादविवाद करीत बसूं नको. दुर्बलता जाण्याचा हाच एक मार्ग आहे. जबाबदारीची जाणीव म्हणजेच दुर्बलतेला ओहोटी. ( I must, therefore I can, असें एक जर्मन पंडित म्हणत असे, त्यांतलें इंगित हेच आहे. ) देव आहे, व त्याची सेवा केली असतां तो अनु- अह करितो, हैं मी सांगतों. मी त्याचा अनुभव घेतला आहे. जी गोष्ट