पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपली प्रगति कांहीं ध्येयास धरून होत आहे काय ? १४७ सर्व क्रियांचा मिळून कांही संकलित भिन्न परिणाम करण्याचे काम त्यांचेकडे नाहीं. मनुष्याकडे तें कर्तव्य आहे. हाच दोघांत खरा फरक आहे; व तो जर राखला नाहीं, तर दोघांतही वस्तुतः कांहींच फरक नाहीं. आलंकारिक भाषेत बोलावयाचे म्हणजे विविध संस्कारांचा कच्चा माल जीवास दिलेला आहे, त्याची सुंदर वस्तु बनवून या विश्वाच्या प्रदर्शनांत मांडण्याचे काम त्याचेकडे दिले आहे. तें न करणाऱ्याला 'विचित्र पशु' म्हणून जगत्कर्त्याने या प्रदर्शनांत मांडिलें आहे, असेच म्हणावे लागेल ! या त्रोटक परंतु निर्भीड दिग्दर्शनावरून, या शरीरयंत्राची मनुष्य- प्राणी या नात्याने काय किंमत असली पाहिजे, हें सहज लक्षांत येईल. सर्व तऱ्हेचे दुरभिमान टाकून जर या दिशेनें अंतःकरणे शोधूं लागलों, तर 'मनुष्य- प्राणी या नात्यानें जगाच्या बाजारांत आमचा भाव उतरला आहे, ' या माझ्या पुष्कळांस कसेसे वाटणा-या विधानांत कांही तरी तथ्य आहे, असे दिसून येईल. सर्व तऱ्हेचे अनुभव घेतल्यावर आणि सर्व तऱ्हेच्या उपपच्या बसविल्यावर विवेकानंदांनींही शेवटीं हिंदुस्थानला 'Pray day and night:- Thou Mother of the universe take away my unmanli. ness and make me man' असाच उपदेश केला आहे. तो शब्दशः खरा आहे, स्वामींच्या हिंदुस्थानसंबंधीच्या सर्व अनुभवाचें तें सार आहे. प्रत्येकाने आपल्या चित्ताचा ठाव काढून पहावा की, आपल्याला समजूं लागल्या- पासून या दिशेनें आपली कोणीकडे तरी, समजून अथवा न समजून तरी, प्रगति झाली आहे कां ? पैशाकरितां, मानाकरितां, सुखोपभोगाकरितां, कुटुं- चाच्या हिताकरितां, विद्यार्जनाकरितां, देशोद्धार, समाजोद्धार, अध्यात्मिक उन्नति वगैरेसारख्या एकाद्या उदात्त हेतुकरितां, अशा नाना साध्यांकरितां धडपड करणारांनी हिशोब करून पहावा की, आपण स्वतःस अशा कोणच्या तरी शाळेत घालून घेतले आहे कां ? आपल्या मुलाबाळांना व संबंधीयांना ती शाळा लाविली आहे कां, कोणत्या तरी ध्येयास धरून शील कमाविलें आहे कां ? ध्येयाच्या दृष्टीनें आपलें पाऊल पुढे पडले आहे किंवा नाही ? आणि तें ध्येय, मी नाहीं तर माझ्या मुलाबाळांनी तरी, अथवा ज्याला माझे वळण देतां येईल अशा कोणीं तरी मिळवावें, अशी शिक्षा त्यांना लावण्याचा प्रयत्न केला आहे किंवा नाहीं ? अथवा जर कांहीं कमाई केली असे वाटत