पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● उपसंहार. घरांत हंसून खेळून राबणाऱ्या धाकट्या सुनबाईसारखी त्याची स्थिती असते. तिला कोणाच्याच साह्याची अपेक्षा करितां येत नाहीं: मिळेल तर मिळो, न मिळाले तरी वाहवा ! त्याच्याकरितां तिला अडून राहतां येत नाही, किंवा कोणीं केल्यास, काम सोडून त्याचे आभार मानण्यास देखील फुरसत नाहीं ! कोणाकरितां असें तिला कांहींच करावयाचें नसतें, परंतु करावयाचें मात्र सर्वच असतें. वस्तुतः त्या घरांत तिचें इतर कोणीही नसतें, परंतु करावयाचें मात्र सर्वांचे असतें. ढापणे लाविलेल्या घोड्याप्रमाणें तिला दुसरें कांहींच दिसत नसते. रात्रीं गांठ पडल्यावर मायेचा हात आपल्या पाठीवरून फिरला पाहिजे, ह्या एकाच गोष्टीचा तिला ध्यास असतो. त्याप्रमाणे आस्तिक माणूस म्हणजे भोगसुखाची फाजील प्रतिष्ठा न बाळगणारा, आकडेदार नागाप्रमाणे उत्साहानें सळसळणारा, कोरड्या कल्पनांत रममाण न होणारा, अखंड कामांत गढून गेलेला, कसलेंही अवडंबर न करणारा, एक अत्यंत साहसी आणि बेगुमान प्राणी असतो ! विवॆचक बुद्धीच्या निर्णयाचीं ह्रीं दोन टोकें आहेत. विचारवान् प्राणी अथवा कोणीही विचारवान् प्राण्याने दिलेला कित्ता, एक तर यांपैकी कोणत्या तरी टोकांत पडणारा, अगर त्याकडे नेणाराच असला पाहिजे. प्रत्यक्ष देवाचें अस्तित्व न मानणाऱ्या अवैदिक मतांनी देखील अतींद्रिय अस्तित्व आणि कर्म- चक्र, गति अगति वगैरे मानिल्यामुळे त्यांच्या अनुयायांची देखील मानवी कर्तव्य-दृष्ट्या जवळ जवळ हीच दशा असते; मग अंतिम पर्यवसान कोणाचें कसेंही असो. प्रत्येक मनुष्य कांहीं या दोन टोकांत पडूं शकणे शक्य नाहीं; पण प्रत्येक मनुष्य जर खरोखर मनुष्यत्वानें जगत असेल, तर त्याची आयुष्य- भर कोणच्या ना कोणच्या तरी बाजूनें प्रगती मात्र होत असली पाहिजे, - मग तें त्याच्या स्वतःच्या परिश्रमाचें फळ असो, किंवा कोणचा तरी कित्ता तो मुकाट्यानें गिरवीत असतो म्हणून असो, असें होईल तरच त्याला मनुष्यप्राणी असे यथार्थ म्हणतां येईल; एरवीं फुटकळ कर्तव्यें व कर्मों तो कितीही बुद्धि- पुरस्सर करीत असो, त्यांत जीव नाहीं. पशूंच्या व त्यांच्या बुद्धीत फरक फक्त मोठ्या धाकट्या प्रमाणाचाच राहील. रक्षकास फसवून चोरी करण्याकरितां गम- तीदार युक्त्या • योजण्याइतकी बुद्धी वानरासही असते, व तें ती उपयोगांतही आणतें. मनुष्येतर दुसऱ्या सर्व सृष्टीविषयही असेंच दाखवितां येईल. परंतु 0