Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनेक उपपत्या व अनेक प्रयत्न. ( १ साहजिकच असा प्रश्न उद्भवेल की हॅ असे कसें झालें ? हें होणें नैसर्गिकच होतें, कां ही स्थिति आगंतुकपणानें आलेली आहे ? ' ' ही स्थिति चांगली कां वाईट ? ' ' हा उन्नतीचा पाया कां अवनतीचा कळस ? ' हा हिंदुधर्माचा नालायकपणा, कां हिंदु म्हणावणाऱ्या लोकांची नादानी?' 'हिंदु संस्कृ तीचीं ह्रीं फळे आहेत, कां राजकीय दोषांचें प्रायश्चित्त आहे ? ' त्याच बरोबर, ही स्थिति घालविण्यास काय केले पाहिजे ? ' ' ही जाणे शक्य आहे किंवा नाहीं ? ' वैदिक शास्त्रे आणि वैदिक संस्कृति ही अजिबात टाकून द्यावी, कां कांही तडजोड करून, आहे या भांडवलावरच नवा कारखाना काढावा ? ' " आहे हे अजिबात टाकून द्यावें, कां दुसरें कांही निर्माण करावें, कोणाचें तरी आहे तसेंच घ्यावें कां पूर्वीचें आणि नवें यांची मेळवण करून मिश्र जाति उप्तन्न करावी ? ' ' जुन्याला नव्याच्या सोगांत आणावें, कां नव्याला जुन्याच्या कोंदणांत वसवावें ? ' असा विचार करितां करितां कित्येक प्रचंड मेंदू थंड होऊन गेले; जवळ जवळ पाऊण शतक अखंड खल झाला, तरी निश्चितार्थाचा कल कोर्णाकडेच वळत नाहीं; बाबा पदमजी आणि जोतिराव फुले यांच्यापा- सून तो लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यापर्यंत अनेकांनी अनेक उपपत्त्या केल्या; विधवेला इष्काचा पेला पाजण्यापासून तो महाराला स्थापित मूर्तीच्या टाळूवरून हात फिरवूं देण्यापर्यंत सामाजिक, प्रार्थनासमाजापासून तो हिंदुधर्मसभेपर्यंत धार्मिक, कार्पेटरीच्या वर्गापासून तो महात्म्यांच्या चरख्याप- र्यंत औद्योगिक, 'एक्या लहान काळ्या मुंगी ? पासून तो गोविंदाग्रजांच्या 'पहिल्या चुंवना' पर्यंत अथवा 'मोरयाच्या सुंदर रूपा' पासून तो टेकाड्यांच्या ‘ मोडक्या तरवारी ' पर्यंत वाङ्मयात्मक, आणि ' साहेबासी नमन पहिले कोणी कां तो असेना,' येथपासून तो सेनानी बापटांच्या सशस्त्र प्रतिकारापर्यंत, सर्व प्रकारच्या चळवळी झाल्या. परंतु अधःपाताची शीग उलट चढतीच आहे, असे प्रांजल अंतःकरणाला वाटल्यावांचून रहात नाहीं. नुसत्या वावदूकतेला ही गोष्ट अर्थातच पटणार नाहीं, आणि पटवून देणेंही शक्य नाही. परंतु समाजांतील विचारशील अंतःकरणांत खोलांतल्या खोलांत जे निरनिराळे ध्वनी उठतात, त्यांचा मथितार्थ पाहूं जातां असेंच म्हणणे भाग पडतें कीं, ते सर्व या एकाच निर्णयाचे पर्याय आहेतः - भयंकर अधःपात झाला आहे, इतकेंच नव्हे, तर अजून होत आहे. गेल्या पावशत-