पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
उपसंहार.

काचा आढावा काढला तरी असेंच म्हणणे भाग पडतें कीं, राष्ट्रदृष्टया पिछे- हाटच झालेली आहे. राजकीय परिस्थिति कशाही असो, आशावादी व्याख्यान- “कार आणि खुशामती पुस्तकमाला प्रगतीची कितीही भडक चित्रे काढोत, को- ट्यवधी रुपयांचे कितीही फंड जमोत, लक्षावधी लोकांच्या कितीही सभा भरोत, ' डौलदार इमारती, टुमदार संस्था, आणि ऐटदार कार्यक्रम यांची कितीही वाढ होवो, ~ एक गोष्ट नाकबूल करता येत नाहीं, कीं एक प्रकारचा भेकडपणा आणि नमुनेदार निरुत्साह यांनी सर्व वातावरण कोंदून गेले आहे. उप्परकी टामटूम केवढीही असो, पक्षघात झाल्याप्रमाणे बहुतेक अंतःकरणें माना टाकून पडली आहेत. व्यक्तिशः पाहिले तर येवढीच प्रगती म्हणतां येईल, कीं देश व काल यांचें परिज्ञान सामान्यतः सर्व व्यक्तींना उत्तम झाले असून, राष्ट्रा- ●करितां आंग चोरून अथवा आंग मोडून, क्वचित् कुठें ओरखडा घेऊनही मेह- नत करण्याची आणि सोर्याप्रमाणें थोडाफार सर्व प्रकारचा त्याग करण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसत आहे. परंतु कोण चाही गुण उत्कर्षानें वाढलेला क्वचित्च दिसून येतो. सभोवतालच्या लोकांत वाटतां येतील, असे गुणांचे साठे नाहींसे झाले आहेत, मग त्यांच्या परंपरा तरी कोठून चालतील ? मोठमोठे गुण तर राहोतच, परंतु विक्षिप्तपणासारख्या गोष्टीकरितां देखील ३० वर्षांमागील श्री- धरपंत दात्यांच्या नांवानें गाथा गाणे भाग पडतें! आयुःप्रज्ञा, बलशील, त्वेष- त्याग, शौर्यचिकाटी, हौसधडाडी, इत्यादि गुण मासल्याला मिळणेही कठीण झाले आहे; 'वापसे बेटा सवाई, ' या म्हणीचा अर्थच पालटून टाकण्याची वेळ आली आहे ! टिळकासारख्या लोकविलक्षण पुरुषाचा अधिकार केळकरांना न येणे साहजिक आहे; परंतु केळकरांची देखील धमक केळकरी तालमीतल्या लोकांत उतरणें अशक्य झाले आहे ! भरती केलेल्या लोकांत प्रत्येकाजवळ ५| १५ काडतुसे जास्त असली म्हणजे जशी त्यांना खड्या लष्कराची किंमत येत नाहीं, तशीच ही गोष्ट आहे. ऋप सारखे कारखाने आणि प्लायमाउथ सारख्या गोया पाठीशी असाव्या लागतात, तेव्हांच त्यांना लष्कराची योग्यता येते. धातुक अस्त्रांच्या परंपरा विणाऱ्या या कारखान्यांची किंमत ज्यांना समजली नाहीं, अथवा समजून ज्यांना साधली नाही, त्या मराठ्यांची व्यक्तिविषयक गुण अंगीं उदंड असून देखील, काय दशा झाली, तें आपण प्रत्यक्षच सिद्ध रून देत आहोत ! तसेंच परंपरा म्हणजे काय चीज आहे, हें ज्या लोकांना