Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्राची सांप्रतची स्थिति.

१३९

त्याला मनुष्यप्राणी म्हणूनच ठरवावा का मनुष्य आणि मनुष्येतर सृष्टि यांच्या- तला एकादा दुवा ठरवावा याचा शास्त्रज्ञांना विचारच पडेल !
 महाराष्ट्राची सांप्रतची स्थिति जर पाहिली तर असे स्पष्टपणे दिसून येतें की, बहुतेक सर्व देश कुंकवास आधार होणाऱ्या म्हाताऱ्या नवऱ्याच्या स्त्री- प्रमाणे, आस्तिकपणाचा टिळा लावून महाभयंकर नास्तिकपणासह स्वैर संचार करीत आहे. आंगवळणी पडलेला सामाजिक आचारधर्म जर सोडला, तर व्यक्तीच्या प्रायशः आचारविचारादिकांचे मुळाशी आस्तिकत्वाची भावना नाहींशी झालेली आहे. आस्तिकत्वाकरितां धर्म, धर्माकरितां नीति, आणि नीतिकरितां समाज वगैरे शास्त्रे, या प्रणालिका सुटून गेल्या असून, समाज, व्यक्ति, देश, धर्म, स्वार्थ, परमार्थ, ईश्वर, उन्नति, आचार, विचार, यांचा परस्पराशी संबंध कांहींच राहिला नसून, तीं सर्व स्वतंत्र शास्त्रेच होऊन बसलीं आहेत | आयुष्याला ध्येय नाहीं; विचारांना वळण नाहीं आचारांना आळा नाहीं; उदात्तपणाची तर कशांतही गरज नाहीं; जुन्या परंपरा मोडून गेल्या; जुनी शास्त्रे नादान अथवा अपुरी ठरलीं; जुने संस्कार पुसून चालले; नव्या परंपरांची गरज नाहीं; नव्या शास्त्राची उत्पत्ती नाहीं; नवीन संस्काराची) सोय नाहीं ! आर्य म्हणजे काय आणि आर्यसंस्कृतीची प्रकृति काय, हाच जेथें संदेह पडला आहे, तेथें नवीन आर्यशास्त्रे, आर्यपरंपरा व आर्यसंस्कार यांची योजना व्हावी तरी कशी ? विस्कळीतपणाचा कळस झाला; कस्य तरोर्मूलं र्येन केनापि मिश्रितम्, ' असले त्रिखंड पांडित्य संपादून, ' यद्वा तद्वा' बुद्धी चालवावी, आणि अद्वातद्वा ओरड करावी, अशी अवस्था झाली; स्फूर्तीत धैर्य नाहीं; मूर्तीत वीर्य नाहीं; कृतींत स्थैर्थ नाहीं; शरीरांत त्राण नाहीं; जीवनांत प्राण नाहीं; असल्या स्थितीत गांधींसारख्या शतं भीष्म म्हणविणाऱ्यास तोंडांत मारून घ्यावी लागली तर नवल काय ? परमार्थ तर दूरच राहिला, स्वार्थ संपादण्याचीही हिम्मत नाहीं; देशकार्याचे नांवाने ओर- डून कोरड पडलेले घसे चहाच्या कपांनी ओले करितां करितां आयुष्याचें आयुष्य जावयाची वेळ येते, तरी लोकमान्यांसारख्या नायकाचे अनुयायी म्हणून घेण्याचीही किंमत येत नाहीं; भक्ति, ज्ञान, वैराग्याच्या कर्ण-कठोर अथवा क्वचित् मनोरम वाटणाऱ्या अद्भुत कथा तर दूरच राहिल्या, पण, बायकापोरांचे राजस, अथवा स्रक्चंदनवनितांचें निव्वळ तामस सुख उप-