पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची रहस्यनिरीक्षणाची दृष्टी. १२५: यामुळे जवळ जवळ एक वर्ष अशाच रितीनें गेलें. लोकमान्यही धिमेपणानें प्रत्येकास यथायोग्य म्हणजे कोणास शास्त्रीय पद्धतीनें, कोणास युक्तिवादानें अ जल्पवितंड आदिकरून सर्व वादपद्धतीनों उत्तर देत होते. अण्णासाहेब यांचे येथेंही यासंबंघी रोज मोठी चर्चा चाले. अनुकूल प्रतिकूल पक्षाचें लोक भेटा- वयाचेच व अण्णासाहेब याचं मत मिळावे म्हणून त्यांच्याशी चर्चा करीत.. स्वतः अण्णासाहेब यांनी हा ग्रंथ वाचून घेण्याचा प्रयत्न केला परंतु विषय-- प्रवेशापलीकडे काही केल्या त्यांची मजल जाईचना. त्यामुळे त्यांच्या तोंडून गीतारहस्याविषयीं निश्चित मत अर्से कोणासच ऐकावयास मिळाले नाही. आलेला मनुष्य जशी विचारसरणी घेईल तशीच घेऊन तशाच प्रकारची विचारसरणी घेऊन अण्णासाहेव त्याच्याबरोबर चर्चा करीत व त्यामुळे अण्णासाहेब हे आमच्याच बाजूस आहेत असे समजणारे पुष्कळ लोक आहेत. वस्तुतः त्यांनी त्या ग्रंथावर अभिप्राय असा कांहीं दिलाच नाहीं. आणि त्याचे कारण त्यांनी तो स्वतः नीट. वांचला नव्हता हेंच आहे. तरी पण ऐकीव माहिती वरून त्यांना सर्व टीकाका- रांच्या व त्या ग्रंथांतील अनुकूल प्रतिकूल मर्मस्थलांचे चांगले ज्ञान होतें. लोकमान्यांचा ज्ञानोत्तर कर्म केलेच पाहिजे हाच श्रीकृष्णावरील 'च' काराचा आरोप त्यांना कितपत मान्य होता हे सांगणे कठीण आहे. एकंदर ग्रंथाविषयी असे दोन उद्गार त्यांनी काढल्याचे स्मरणांत आहे. तरी पण पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि आर्य तत्त्वज्ञान यांची साधिकारपणानें तुलना करून पाश्चात्य विचारसरणीप्रमाणे पाहिले असतांही आमचें तत्त्वज्ञानच कसें परिपूर्ण आहे आणि मनुष्याच्या जीविताशी संबंध असलेले सर्व प्रश्न त्यानेंच कसे सुट तात असे सिद्ध करणारा तो एक ग्रंथ असल्यामुळे वाङ्याय क्षेत्रांतील भारतीय श्रेष्ठत्वाच्या कीर्तीस्तंभाप्रमाणे त्यांना त्याचें महत्त्व वाटे. व तेवढ्याकरितां कोठे कांहीं दोष जर त्यांत असले तर ते निघून जाऊन तो अगदीं निर्दोष व्हावा एवढ्याच दृष्टीनें त्याचें परीक्षण करावें असे ते म्हणत. म्हणजे त्यांतही लोकमान्यांची कीर्तिकुसुमें अम्लान राहून त्यांचा परिमल दशदिशांत कसा भरून राहील याचीच चिंता दिसून येई. रहस्यनिरीक्षण करणाऱ्या अनेक वादी पुरुषांची दृष्टी व ही दृष्टी यांच्यांतील जमीन अस्मानाचा फरक पाहिला म्हणजे फार मौज वाटते. किंबहुना कोणच्याही हिंदू मनुष्यानें केलेल्या असल्या कृतीकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी असे,