पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकमान्य आणि अण्णासाहेब. गीतारहस्याविषयीं कांहीं विशेष वोलले असलेच तर एक वेळेला " अरे अकराव्या अध्यायावद्दल काय लिहिले आहे. गीतेंत अकराव्या अध्यायाचें काय महत्त्व आहे हें ज्याला कळले, त्याला गीतारहस्य कळले. त्याच्याखेरीज निष्काम कर्म म्हणजे काय हे कळणार नाहीं व होणारही नाही. नुसतें ‘ निष्काम कर्म' ' निष्काम कर्म ' म्हटलें म्हणजे झाले वाटतें ! " असें म्हटल्याचे आठवतें. त्याचप्रमाणे भारतांतील नारायणी आख्यानास लोकमा न्यांनी अतिशय उचलून वरून त्यावर पुराव्याचा मुख्य भर ठेवला आहे. पण या साक्षीदाराच्या महत्त्वाविषयीं, अधिकाराविषयों व खरेपणाविषयीं ते शंका प्रदर्शित करीत. नारायणीयांतील विश्वरूप दर्शनाबद्दल तर ते नेहमी म्हणत कीं, ' याचा मला उलगडा होत नाही. जीवाचें गार्डे कोठें तरी जबरदस्त 'अडलेले चालू करण्याकरतांच असल्या प्रकारचे चमत्कार होतात. ते काय •सुखासुखी वाटेवर पडले आहेत. अशा तऱ्हेचे जबरदस्त प्रयोजन नारदासंबंधीं उपस्थित झालेलें तेथें कांहींच दिलें नाहीं " असे ते म्हणत. व विश्वरूपदर्शन म्हणजे काय ? आणि त्याच्यांत व मृत्तिकाभक्षक वाळकृष्णानें यशोदामातेस 'दाखविलेल्या विश्वरूपांत किंवा तसल्याच पुराणांतील इतर प्रसंगांत काय फरक आहे तोही सांगत. अकराव्या अध्यायांत भगवंतांनी अर्जुनास नुसतें आपलें ऐश्वर्यच दाखविलें नाहीं. तर त्याला भगवत्संकल्पाचें ज्ञान करून दिलें अशा तऱ्हेची कांही त्यांची विचारसरणी होती. असो. १२६ लोकमान्य मंडालेहून आले त्यावेळी त्यांना कसा आनंद झाला तें मार्गे सांगितलेंच आहे. नेहमी लोकमान्यांविषयीं वडील माणसांनी होतकरू अशा गुणी मुलाचे कौतुक करावें त्याप्रमाणें अरे तुरे असा प्रयोग करून आनंदानें बोलत असतां त्यांचा लोभ व्यक्त होई. आणि लोकमान्यही तशाच जिव्हाळ्यानें त्यांच्याशी वागत. मंडालेहून आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेऊन देवदर्शनास गेले असतां प्रथमतः श्रीगणपती व अण्णासाहेब यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या व्यवहारास सुरवात केली हैं लक्षांत ठेवण्याजोगें आहे.