Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ लोकमान्य आणि अण्णासाहेब. व उत्तरोत्तर तो वाढतच गेला. टिळकांच्या मनांतही अण्णासाहेब यांच्याविषयीं पराकाष्ठेचा आदर होता. किंबहुना राष्ट्रपुरुष या नात्यानें अण्णासाहेब यांची -योग्यता केवढी मोठी होती याची जाणीव असणारा पुण्यांत तेवढाच एक पुरुष होता. सर्व तऱ्हेच्या अनुभवांच्या भींतून बाहेर पडलेल्या अण्णासाहेब यांच्या 'धार्मिक सामाजिक वगैरे मतांचे व टिळकांचें पटणें अर्थातच शक्य नव्हते परंतु त्यामुळे त्यांच्या लोभांत कवींच अंतर आले नाही. याचे कारण असे की, पंचहीद प्रकरण जर सोडून दिले तर वरील बावतींत टिळकांची 'नद्वेष्टि संप्रत्र- त्तानि न निवृत्तानि कांक्षति' अशी उपेक्षावृत्ती असल्यामुळे टिळकांचा एखादा वेगळाच पक्ष होऊन दोघांचा उघड विरोध होण्याचें कारण नव्हतें. व राजकीय बाबतीत तर दोघांचीही आकांक्षा एकच होती त्यामुळे हे विरोध आड न येतां लोम वृद्धिंगतच होत गेला. किंबहुना टिळकांच्या या इतर बाजूकडे न पाहातांच त्यांच्यावर लोभ करावयाचा असें अण्णासाहेब यानीं ठरविले असावें असे दिसतें. "आम्ही दोघेही गाडींत वसून चाललो होतों. वाटेंत आमचें बरेंच वोलणें झाले तेव्हांपासून मी त्याच्याविषयींचें आपलें धोरण ठरवून टाकलें" असें एकदां त्यांनी सांगितलें तें कांही असले तरी एवढें खरें कीं, दोघांचा संबंध अतिशय •जिव्हाळ्याचा होता. व टिळकांच्या सर्व प्रयत्नांस त्यांची सहानुभूती असे. चोहीकडे माजलेल्या षड्गुणेश्वर्यामुळे जेथें तेथें त्यांना एकट्यालाच पुढे पडावें • लागतें, याचा त्यांना मनापासून संताप येई. व त्यामुळे त्याला यश वुद्धि तेज यांचे कृपादान यावे म्हणून ते महाराजांची नित्य प्रार्थना करीत. मागे एका ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच ही गोष्ट सांगितली. लखनौ काँग्रे- सच्या वेळचा टिळकांचा जयजयकार ऐकून अण्णासाहेब यांस झालेला आनंद ज्यांनी आळंदीस पाहिला त्यांना तरी शिवरायाकरितां 'तुझा तूं वाढवी राजा' म्हणून तुळजा भवानीची करुणा भाकिल्यावर आनंदवनभुवन पाहाणाऱ्या श्रीसमर्थांची आठवण झाल्यावाचून राहिली नसेल. लोकमान्यांचें गीतारहस्य बाहेर पडल्यावर त्याची एक प्रत भेट म्हणून यांचेकडे आली. गीतारहस्यानें वाङ्मयक्षेत्रांत कांहीं वेळ केवढी खळवळ उडवून दिली होती, तें प्रसिद्धच आहे. परीक्षण, निरीक्षणें, खंडणे, आणि -मंडणें, टीका प्रतिटीका व व्याख्यानें असें मार एकच रण माजून राहिलें होतें.