पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकमान्य आणि अण्णासाहेब. लोकमान्य टिळक व अण्णासाहेब यांचा संबंध तर लोकविश्रुतच आहे. लोकमान्य हे मूळचे रानड्यांच्या तालमीतले. परंतु रानड्यांसारख्या शांतिब्रह्माच्या सहवासांत त्यांच्या आंगच्या ' वीरो रसः किमयमेत्युत दर्प एव' अशा क्षात्रवृत्तीला नीट वाव मिळेना व लौकरच रानड्यांच्याविषयीं मनांत अतिशय आदर असूनही त्यांना रानड्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली. मद्रासेस जाण्यापूर्वी अण्णासाहेब यांनीं डेक्कनस्टार व किरण अशी दोन पत्रे सुरू केलीं होतीं. पैकीं डेक्कनस्टार हैं इंग्रजी होतें व किरण हें कांहीं इंग्रजी व कांहीं मराठी असें होतें. अण्णासाहेब यांच्याजवळ ज्या अनेक प्रकारच्या योग्य- तेच्या माणसांचा संग्रह होता. त्यांत माधवराव नामजोशी हेही एक होते. या गृहस्थांच्या अंगांत विद्वत्ता इत्यादि गुण जरी विशेष नसले तरी गोड भाषण खुबीदार रीतीनें दुसऱ्याचें मन वळविणें एकाद्या कार्यास हात घातला कीं, त्याच्याकरतां वाटेल त्या खटाटोपी करण्याची उपव्यापशक्ती व धोरणी- पणा वगैरे अनेक गुण होते. मुंबईस ज्या कांहीं अनेक औद्योगिक चळवळींचा उपक्रम अण्णासाहेब यांनी केला होता, त्यांचे सुईणपण नामजोशांच्या- कडे होतें. मद्रासेस जाण्यापूर्वी डेक्कनस्टार व किरण यांचे रूपांतर मराठा व केसरी यांच्यांत केल्यावर नामजोशी व टिळक यांचा विशेष संबंध आला.. हाच अण्णासाहेब व टिळक यांच्या संबंधांतील मधला दुवा आहे. नामजोशी व टिळक यांचा संबंध नामजोशी असेपर्यंत तसाच टिकला.. गणपतिउत्सवानंतर अण्णासाहेब व टिळक यांचा प्रत्यक्ष संबंध पडूं लागला. तरीही नामजोशी यांच्या द्वारे त्यांचा व अण्णासाहेब यांचा संबंध पूर्वीपासूनच होता. नामजोशी असेपर्यंत टिळक व्यवस्थेशीर होते व पुढे ते वाहवले असा जो एक प्रवाद आहे त्यांत किती तथ्य आहे हें यावरून लक्षांत येईल. कारण नामजोशांच्या मागे असलेले अण्णासाहेब हे जवळ जवळ टिळकांच्या अखेरपर्यंत होते. आणि सर्व महत्त्वाच्या बाबतीत त्यांचा सल्लाही घेतला जात असे. असो. धैर्य, साहस, विलक्षण चिकाटी, प्रखर स्वाभिमान, वगैरे दोघांच्याही आंगच्या गुणसाधर्म्यामुळे अण्णासाहेब यांचा टिळकांवर फार लोभ जडला.. 0