Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादांची तेजस्विता. त्यांना पुष्कळसा प्रवास घडून चमत्कारिक प्रसंग, विचित्र देखावे, महाराजांची अद्भुत लीला व सामर्थ्य हीं सर्व पहावयास सांपडून लहान मोठ्या अनेक लोकांचा परिचयही झाला. व जरी अर्वाचीन पद्धतीप्रमाणें ते विशेषसे सुशि- क्षित नव्हते व लिहिण्या वाचण्यापलीकडे त्यांची मजल केव्हांच गेली नाहीं, तरी देखील बहुश्रुतपणा सत्समागम प्रवास व अवलोकन यांनी जें कार्य करा- चयाचें तें त्यांचे ठिकाण होऊन गेलें होतें. श्रद्धा व उत्साह यांच्या भरांत कित्येक गोष्टी करण्याचा व अतिशयोक्तीनें सांगण्याचा माणसांचा स्वभाव सोडून दिला तर दादा म्हणजे महाराजांविषयींच्या सर्व प्रकारच्या माहितीचें भांडारच होते. सुमारें बारा वर्षे अशा रितीने काढल्यावर महाराजांनी विवाह करून गृहस्थाश्रम करण्याची त्यांस आज्ञा केलीं व त्याप्रमाणें चतुर्भुज होऊन त्यांनी शाळाखात्यांत नौकरी धरली. शाळाखात्यांतील नौकरी करीत असतांना सुप्रसिद्ध लीवार्नर साहेब यांचा व त्यांचा प्रसंग झाला. दाव्हर्याजवळ लाडखेड येथें एकदां शाळेत शिकवीत असतां महाराज त्यांचेकडे आले, व टेवलावर पाय टाकून तमाखु खात बसले होते, इतक्यांत लीवॉर्नर सहज तेथें येऊन पोचले. त्यांना पाहून खुर्चीवरून उठा- वयाचें अथवा दुसरी कांहीं सलामी करावयाची, तें कांहींच न करितां उलट महाराज हांसत हांसत तमाखु खाऊं लागले. तेव्हां अर्थातच त्याचा संताप होऊन महाराजांस कांहीं तरी अपमानकारक असे तो बोलला. दादा इंग्रजांचे नौकर होते, तरी इंग्रजी शिक्षणाच्या चरकांत पिळले गेले नव्हते. त्यांस तें काटून सहन व्हावयाचें ? त्यांनी लागलेंच टेवलावरचा रूळ उचलला, व साहेबास आडवे झाले. तेव्हां मनांत उमजून साहेब बहादूर तसेच परत फिरले व तंबूंतून त्यांनी दादांस बोलावणे पाठविलें, साहेबासमोर गेल्यावर प्रथमतः नौकरीस खो बसणार, हें तर उघडच होतें; परंतु आणखी काय होतें, तेंही सांगण्याजोगतें नव्हतें; परंतु भीति ही त्यांच्या साहसी मनाला कर्धी फारशी शिवलीच नाही. खुर्जीवर महाराज तसेच शांत- पणे बसून राहिले होते. त्यांची आज्ञा घेऊन दादांनी साहेबाची भेट घेतली परंतु तेथें पाहतात तो अपेक्षेप्रमाण कांही न घडतां, अगदी उलट घडून आलें. तू इतका रागावसास कां म्हणून " साहेबानेंच त्यांना विचारलें. तेव्हां ते J माझे गुरु आहेत. व गुरु म्हणजे आम्हां हिंदु लोकांस काय आहे, याची