Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ श्रीभक्त दादा दांडेकर. कल्पना आपणांस असली पाहिजे, कारण आपण इकडे बरेच राहिलेले आहां,' असें दादांनी सांगितले. तेव्हां ती गोष्ठ तितकीच सोडून साहेबांनी विचारले कीं, तूं असल्या मास्तरीच्या नौकरीस लायख नाहीस, पोलीस खात्यांत नौकरी करीत असलास तर, एकदम पन्नास रुपायांची नौकरी देतों, व पुढे वाढशीलही पुष्कळ ' हे ऐकल्यावरोवर दादांस योठाच हर्ष झाला. कोठें शाळा खात्यांतील आठ रुपये व कक्का किक्कीचें भिकारडॅ काम, एकदम पचास रुपायांची नौकरी, वाढण्याची पुष्कळ आशा, मोठा दर्जा व मनाजोगतें रगडून घोड्यावर बसावयास मिळणार, तेव्हां तो मोह जबरदस्तच होता; परंतु त्यांनी उत्तर दिलें कीं, 'थांबा, मी महाराजांस विचारून येतो. महाराजांस विचारतां त्यांनी ती गोष्ट साफ उडवून दिली. त्यामुळे दादांना जन्मभर दारिद्र्यांत खितपत पडणे भाग आले. अशा रीतीनें दारिद्र्यपूर्ण संसाराच्या खडतर शाळेत त्यांना लोटतांना महा- राजांनी त्यांना दोन देणग्या देऊन ठेवल्या; एक तर एकदम ध्यानयोगास लावून दिलें, व स्वतः अनुग्रह देऊन उपासनेस लाविलें. या दोन गोष्ठींच्या सहाय्यानें दादांनी आपली जीवितयात्रा काढली. यांचा स्वभाव दुर्वासासारखा तामसी होता; परंतु अंतःकरण अतिशय मायाळु, कोणच्याही गोष्टीची खरी कळकळ, अतिशय स्वाभिमान, व स्वदेश आणि स्वधर्म यांच्या ऊर्जिताची तळमळ, इत्यादि इतर गुणांमुळे त्या तामसी वृत्तीचा कांहीं दुरुपयोग न होतांना चार चांगल्या लोकांच्या साहाय्यानें यांचें हे आयुष्य चांगलेच गेलें. अण्णासाहेव यांचा व दादांचा गुरुबंधूंसारखाच संबंध होता, परंतु सर्वत्र महाराजाच दिसत असलेल्या व यत्किंचितही बोध करणाऱ्या वस्तुमात्रास गुरुरूप समज- णाया अण्णासाहेबाच्या अवधूतवृत्तीस प्रज्ञावर्धन स्तोत्राच्या गोष्टी नंतर दादां- संबंधानें विशेष कांहीं वाटत असल्यास मोठेसें आश्चर्य नाहीं. तेव्हांपासून त्यांच्या गुरुमालिकेंत दादांचें नांव पडले, व अखेरपर्यंत दादांशी ते तसेच वागले. ' महाराजांच्या संबंधानें आज जी विविध माहिती आहे, तिचे बहुतेक श्रेय दादांनाच आहे. यांच्या ध्यानयोगसिद्धीच्या व महाराजांवरील निष्ठेच्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यांच्याशी येथें कांहीं कर्तव्य नाही. यांच्या संतती- पैकीं रा. सदाशिवराव बापुसाहेब हे उमरावतीस म्युनिसिपल शाळेत मास्तर ०