पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभक्त दादा दांडेकर. मागें प्रज्ञावर्धन स्तोत्राची गोष्ट आली आहे. तिच्यावरून महादेव अनंत उर्फ दादा दांडेकर यांचें नांव वाचकांस कळलेच आहे. प्रज्ञावर्धनाची गोष्ट झाल्यापासून अण्णासाहेब यांनाही गुरुस्थानींच मानीत असत. हे गृहस्थ मूळचे दाभोळजवळ गुडघें म्हणून गांव आहे तेथील खोत यांचे वडील अनंतराव यांस एक मूल झाले त्यावेळी कर्जामुळे आणि भाऊवंदांच्या त्रासामुळे ते इतके चैतागले होते कीं, उद्योगधंदा पाहाण्याकरितां म्हणून वायको व मूल घेऊन देशावर आले असतां धौम महावळेश्वराच्या जंगलांत त्यांनी जीव देण्याचा विचार केला. चार महिन्याच्या पोरास झाडाचे पारावर ठेऊन जवळच कोठें जलाशय होते तेथें ते जीव द्यावयास गेले. तेव्हां त्या स्त्रीपुरुषांत आधी कोणीं मरविं असा वाद सुरू झाला. इतक्यांत श्रीनरसिंहसरस्वती महाराज सहज तेथें आले व त्या मुलास पाहून त्यांनी त्याला उचलून घेतले व त्याच्या आईवापांचा शोध करीत त्या जलाशयापाशी आले. त्या दंपत्याची सर्व हकी- कत कळून आल्यावर त्यांनी आत्महत्येपासून त्यांना परावृत्त केले व तुमचें कल्याण होईल म्हणून आशीर्वाद देऊन परत घरी पाठविले. असे सांगतात की, दांडेकर भटजीस दम्याचा विकार होता. महाराजांनी अनुग्रह देऊन परत घरीं जावयास सांगितलें तेव्हां दादांच्या मातोश्रीनें दम्याच्या विकाराविषयीं तक्रार केली. तेव्हां जर दुसरा कोणी हा दमा घेईल तर अंतू भडजीचा रोग जाईल असें महाराजांनी सांगितले. त्यावरून स्वतः त्या बाईनेंच तो दमा पत्करिला. व तेव्हांपासून त्या बाईची ठस् ठस् सुरू होऊन अंतू- भटजी खडखडीत बरे झाले. मूल परत देतांना महाराजांनी सांगितले की, हा आमचा मुलगा आहे त्याप्रमाणें तुम्ही यास वाढवा याची मुंज झाली की, आम्ही घेऊन जाऊं. अंतू भटजी देशी परत गेल्यावर त्यांचे दिवस पालटले व यथाकाल त्यांनी त्या मुलाची मुंजही केली. मुंज केल्यानंतर सुमारें चार महिन्यांनी कोठूनसे महाराज एकदम येऊन उतरले व सांगून ठेवल्याप्रमाणे त्या मुलास घेऊन गेले. हा मुलगा म्हणजेच दादा दांडेकर. या नंतर सुमारें बारा वर्षेपर्यंत दादा महाराजांच्या जवळच होते. त्यामुळे 0