Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीवरद राजांचें ब्रह्मकर्म. अशी त्यांस सहज इच्छा झाली. दुरूनच त्यांनी विचारिलें कोण रे तो? एवढ्या रात्री काय करतोस ? तेव्हां त्या व्यक्तीनें उत्तर केले ' मी आहे ' ' ब्रम्हकर्म करीत आहें.' ते सांगत-जवळ जाऊन पाहातों तो 'स्वामी' तेव्हां अतिशय आश्चर्य वाटून त्यांनी विचारलें तूं रे कसले ब्रम्हकर्म करतोस ? तेव्हां श्रीवरद- . राजांनी उत्तर केले ' मला कसले आलें कर्म पण हें तुझ्याकरितां करतो. माझें नांव सारखें घेत राहिल्यामुळे तुझ्या हातून ब्रम्हकर्म घडत नाहीं तेव्हां तुझा धर्मलोप होऊं नये म्हणून मला हें करावें लागतें.' अशा प्रकारच्या त्यांच्या मजेदार गोष्टी आहेत. कोणच्याही तऱ्हेच्या लेखनास प्रारंभ करण्यापूर्वी सकाळी एकदां राम नाम लिहावयाची 'जी अण्णासाहेब यांस संवय होती, ती रामचंद्रअय्यांच्या सहवासाचाच परिणाम रामनामस्मरण लेखन-वाचनाच्या उपदेशाबरोबरच रामचंद्रअय्यांनी त्यांना 'दशेंद्रियव्यापारसहित स्मृतीचें वैक्लव्य राहिल्या' चा वर दिला. अण्णासाहेब यांचे एकंदर पुढील आयुष्य आणि निर्याण ज्यांनी पाहिले आहे, त्यांना या गोष्टीची सत्यता तेव्हांच पटेल. या रामचंद्रअय्यांची समाधी कंचीस आहे.