पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धुळ्याचे वोवासाहेव. बुवासाहेबांनींच अण्णासाहेब यांस सांगितलें. बुवासाहेब यांची वृद्ध मातोश्री जवळच असावयाची, परंतु धन्य आहे त्या माउलीच्या श्रद्धेची की महाराजांचा राग न येतां, अथवा वाईट न वाटतां उलट बुवासाहेबांच्या पाठीस आपल्या हातानें तेल लावीत असतां त्यांनीच 'नारायण, महाराजांनी मारले आहे, त्यांत आपले कल्याणच आहे, वाईट वाटू देऊं नकोस, ' असें समाधान करावें. बुवासाहेबांना महाराजांनी षट्चक्रभेदाच्या मार्गानें नेलें होतें. या पद्धतीनें अभ्यास करीत असतां मध्यें केव्हां तरी त्यांची स्थिति अगदी भ्रमिष्टासारखी झाली होती. निर्विकल्पक स्थितीच्या अनावर मोहानें कित्येक देवसचे दिवस ·लाकूड होऊन पडणाऱ्या श्रीरामकृष्ण परमहंसाच्या पाठींत प्रत्यक्ष लांकूड घालूनच त्यांना शुद्धीवर आणावें लागे, असे त्यांच्या चरित्रांत लिहिलेले आहे. तें वाचलें म्हणजे महाराजांच्या या वर्तनाचा उलगडा होतो. बुवासाहेब यांचा अभ्यास पुरा झाल्यावर त्यांच्या स्थितप्रज्ञतेची कसोटी पाहण्याकरितांच की काय तो वेडा एक दिवस सुरी घेऊन मंदिरांत शिरला, व त्यानें बुवासाहेबांस हांक मारली. योगाभ्यास करीत असतांना कांही कारणाने बुवासाहेब यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे त्यांचे सारे व्यवहार श्रवणद्वारेंच चालत. हांक ऐकतांच बुवासाहेबांनी हात जोडून 6 काय आज्ञा आहे, ' म्हणून विनंति केली. त्यावेळेस सुमारें अकरा •वाजावयाची वेळ होती, व मंदिरांत साधारण सामसूम होती. वेड्यानें सांगितलें कीं, ‘आपली मान कांपून पाहिजे, ' त्याबरोबर मोठ्या आनंदानें बुवासाहेबांनी मान पुढे केली. तेव्हां तिच्यावर जवळजवळ असे तीन घाव घालून त्याने ती तोडण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर रक्ताचें थारोळे होऊन गेलें, तरी बुवासाहेबांनी हूं कां चूं देखील केले नाहीं । तेव्हां तो वेडा हंसूं लागला. त्यामुळे कोणी तरी तेथें आलें व त्याच्या हाकेवरून बरींच माणसें गोळा झाली. तेव्हां तो वेडा तेथून निघून ओटीवर हंसत बसला. लवकरच जमलेल्या लोकांनीं त्याला पोलीसच्या स्वाधीन केलें, परंतु बुवासाहेबांनी ताबडतोब त्यास मोकळें करविलें, व उलट सद्गदितपणानें त्याच्या पायांवर डोके ठेवलें. वेंडाच तो; त्यानें एकदा माने- वरून हात फिरविला, व तेथून जे पलायन केलें, तें स्वारी पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडली नाही. ११०