Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धुळ्याचे बोवासाहेब. यांच्या आयुष्याशी संबंध असलेली तिसरी महत्त्वाची व्यक्ति धुळ्याचे वुवा- साहेब म्हणजे नारायणबुवा रुद्र हे होत. यांचा आणि अण्णासाहेबांचा संबंध गुरुबंधु या नात्यानें आला. श्रीशल्यपर्वतावर अवतार गुप्त न करतां नाना वेषांनी जगदुद्धार करीत असलेले श्रीनरसिंहसरस्वती म्हणजेच महाराज, अवतार नव्हे, साक्षात् तीच मूर्ति, अशी श्रद्धा असलेले हे दुसरे गृहस्थ. मूळचे जाल- वणकडे राहणारे. पूर्वीच्या कालमानाप्रमाणें थोडेसें शिक्षण होतांच नाशिकास कांहीं उद्योगधंदा करून श्रीरामाचे पुजारी म्हणून पुरंद यांच्या राममंदिरांत धुळ्यास आले. नाशिक येथें असतांच एका हरदासबुवांचा सहवास घडून यांना गायनाचा अभ्यास झाला, व त्या झाला अनुकूल अशी गोड आवाज वगैरे सामग्री असल्यामुळे तिच्यांत यांनी मोठेंच प्रावीण्य संपादिलें. पुजारी म्हणून धुळ्यास आल्यावर लौकरच श्रीमद्भागवतांतील योगवर्णनें ऐकून यांचें लक्ष योगमार्गाकडे लागलें. बुवासाहेब यांस विवाहाचा संस्कार नुसता शपथेलाच घडला होता. म्हणजे त्या काळाप्रमाणे अगदी बाळपणी लग्न होऊन लाग- लींच त्यांची पत्नी निवर्तली. म्हणजे वस्तुतः ते ब्रम्हचारीच होते. उत्कृष्ट ब्रम्हचर्य, सुदृढ शरीरप्रकृति, पवित्र मनोरचना, भावयुक्त अंतःकरण आणि दृढनिश्चय इत्यादि साहित्याच्या जोरावर लौकरच त्यांनी योगमार्गांत चांगलीच प्रगति केली. महाराजांची व यांची गांठ केव्हां पडली व कशी पडली, हें कळण्यास कांहींच साधन नाहीं. तरी पण अभ्यासाच्या सुरुवातीलाच महा- राजांनी यांना अनुग्रह दिला असावा असे वाटतें, व तेव्हांपासून आळंदीस महाराजांचे दर्शनास जाण्याचा त्यांचा प्रघात होता. 1 ' जगांत धुळ्यास त्या वेळेला तीन प्रसिद्ध वेडे होते. त्यांपैकी पिशाच अंतरी शहाणा, ' अशा एका महात्म्याजवळ श्रीमहाराजांच्या आज्ञेवरून बुवासाहेब योगाभ्यास शिकले. असेंही ऐकण्यांत येतें कीं, स्वतः महाराज देखील त्याकरितां केव्हां तरी धुळ्यास येऊन राहिले. होते. योगाभ्यास करीत असतांना कांहीं वेळेला चित्त चलित होऊं लागलें असतां, अथवा इतर कोणत्याही कारणानें असो, अभ्यासप्रसंगी वेताच्या छडीनें त्यांनी बुवासाहेबांची पाठ फोडून काढावी ! अर्से स्वतः