Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुवासाहेबांचे दृष्टिहीनत्व. १ पुढें फाल्गुनांत बुवासाहेब जेव्हां आळंदीस आले, तेव्हां महाराजांनी मोठा आनंद प्रदर्शित करून नारायण माझे हृदय आहे, म्हणून सर्वांस सांगितलें. असे सांगतात की, त्यावेळी महाराजांस पहातां येत नाही म्हणून वुवासाहेबांस वाईट वाटले. तेव्हां डोळ्यावरून हात फिरवून महाराजांनी त्यांना दृष्टी दिली. व 'आणखी काय इच्छा आहे ? ' म्हणून विचारलें, महाराजांची श्यामसुंदर मूर्ति आणि सदयधवल असें सुहास्य डोळे भरून पाहि- ल्यावर वुवा साहेबांनी विनंति केली कीं ' एकदां आपणास पाहिल्यावर आतां पुन्हां जग पाहण्याची इच्छा नाहीं. तेव्हां डोळे पूर्ववत् करावे. ' त्यावर थोडेसे हंसून महाराजांनी पुन्हा तोंडावरून हात फिरवितांच दृष्टिहीनत्व आलें. 'दृष्टीवांचून तुझें कांही अडणार नाहीं, ' असा त्यांना आशीर्वाद देऊन श्रीद- त्तजयंतीच्या पारण्याची आज्ञा देऊन महाराजांनी त्यांना धुळ्यास परत धाडलें. लौकिकरीत्या वुवासाहेबांचा प्रपंच उत्तम चालावा, म्हणून त्यांना एक लहानशी सिद्धीही देऊन ठेविली होती, परंतु तिचा उपयोग वुवासाहेबांनी फारच क्वचित् प्रसंगी करावा. केव्हांही पैशाचा कांही प्रसंग आला असतां यांच्या जवळ एक डबी होती, तीत त्यांनी पहावयास सांगावें, व जितक्या रकमेची गरज असे तितकी रक्कम अगदर्दी हटकून त्या डबीत सांपडत असे. योगाभ्यासाच्या परिपाकानें अंगीं अवश्य येणारें सामर्थ्य बुवासाहेबांच्याही जवळ होतें व अंतज्ञीन, वाक्सिद्धी, भविष्यज्ञान, थोड्या अन्नाचें पुष्कळ अन्न करणे इत्यादी चमत्कार प्रसंगोपात्त त्यांच्या हातून घडलेले पाहिलेले लोक आज आहेत. परंतु या भानगडीत आपण होऊन ते कधीं पडले नाहीत. त्यांचा स्वभाव अतिशय कडक व उग्र, भाषण फारच परिमित व राहणी कमालीची नेमस्त होती. ' वुवासाहेबांसारखा संत अवध्या हिंदुस्तानांत पाहिला नाहीं, कोणचीही गोष्ट मी केली, अथवा मी करीन, असे कधीं त्यांच्या मनास शिवलेंच नाहीं, करणे कां न करणे सर्व कांहीं महाराज करतात, असा त्यांचा निर्भर होता, असें अण्णासाहेब त्यांच्याविषयों नेहमी म्हणत. , बुवासाहेबांचे छोटेसेंच कां होईना एक त्यावरून त्यांची जास्त हकीगत सहज कळेल. चरित्र प्रसिद्ध झालेले आहे, महाराजांनी सांप्रदायाचा वडीलपणा त्यांचेकडे दिल्यावर त्यांनीं तो १५ वर्षेपर्यंत यथायोग्य चालविला, व मागील एका प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे स्वतः जाण्यापूर्वी