Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ श्रीनरसिंहसरस्वती महाराज. माड्या आहेत. श्रीमहाराजांच्या समोरच अगदी रस्त्यावरील प्रवेशस्थलीं मधल्या कमानीत श्रीअण्णासाहेब यांची पायरी असून तिचें काम संगमरवरी आहे. मठास जोडून एक प्रचंड पाकशाळा आहे व भोंवतीं मोठें आवार असून त्याच्याभों- वर्ती सुंदर तट आहे. आवारांत दोन विहिरी व मोठा बगीचा असून पलीकडे श्रीमहा- राजांचा घाट व इंद्रायणीचें पात्र आहे. प्रदक्षिणेचे वाटेवरील औदुंबराजवळ उभे राहिले असतां नयनसुंदर देखावा दिसतो व मनास मोठा आल्हाद होऊन पहाणाराची वृत्ति क्षणभर भक्तिभावांत लीन होऊन जाते. मठांतील गोशाळा बरीच मोठी असून जवळच लहानसा रथ आहे. त्यांतून पौ० शु॥ १४ स सायंकाळी श्रीमहाराजांची मिरवणूक काढितात. श्रीअण्णासाहेब यांचे कमानीचे वरल्या आंगास नगारखाना असून तिन्हीं त्रिकाळीं चौघडा वाजतो. मठांतील पाकशाळेत अतीथअभ्यागताचे आदरातिथ्य उत्तम प्रकारें केलें जाते. एकंदर सर्व व्यवस्था पाहून येणारा मनुष्य मोठा संतुष्ट होऊन जातो. उत्सवाचे दिवस खेरीज करून मठांत सर्वत्र शांतता असते. त्यामुळे एकांतवास करण्याला, चार दिवस शांतपणे घालविण्याला, नानाप्रकारचे योगाभ्यास कर ण्याला, सर्व तऱ्हेचे अध्यात्मिक अनुभव घेण्याला आणि आपल्या मनबुद्ध- द्रियांना प्रेमरसाची भावना देऊन आनंदमय अशा भक्तिभावांत मुरून जाण्याला हें स्थळ सर्व तऱ्हेनें अनुकूल असल्यामुळे श्रीअण्णासाहेबांना अतिशय प्रिय असलेल्या या स्थळाचें दर्शन श्रीअण्णासाहेब यांची स्मृति जागविणाऱ्या महा- राष्ट्राला सदैव आल्हादकारक व स्फूर्तिप्रदच होईल यांत काय संशय ?