श्रीमहाराजांचें संस्थान. १०७. ष्टित वीरगंभीरताही नाहीशी होऊन त्यांच्या डोळ्यांत अश्रु आले. महाराजांची तसबीर म्हणजे त्यांच्या थ्टीनें प्रत्यक्ष महाराजच होते. महाराजांच्या संमतीनें का होईना त्यांच्या शरीरांत खिळे मारीत अस- लेले पाहून त्यांचे अंतःकरण कळवळले. कारण त्यांचा भाव जिवंत होता. असो. आतां तसबीर ठेवून देणार इतक्यांत त्यांनी बापटांस हाक मारून सांगितलें ' अरे, एकदां काचेवरून तसवीर काढून तर पहा. ' तेव्हां त्यांच्या समजुती करतां तसा फोटो घेण्यांत आला. तो फोटो खरोखरच फार सुंदर निघाला. हे पाहून सर्वांसच मोठे नवल वाटलें. श्रीमहाराजांचें निर्याण या प्रकरणांत त्यांच्या जाण्यासंबंधी सर्व हकीकत दिलेलीच आहे. त्यांच्यामागून संस्थानचें चालकत्व क्रमानें ह. भ. दत्तोपंत आठवले, शंकरवुवा सोनगीरकर आणि त्यानंतर हल्ली गादीवर असलेले श्री. भ. माधवराव गोडबोले यांजकडे आलें. हे तिन्ही पुरुष त्यांच्याकडे आलेल्या कामगिरीस परोपरीनें योग्यच असल्यामुळे श्रीसंस्थानचे काम सुरळीतपणे चालून उत्तरोत्तर उत्कर्षच झाला. हल्लींचे संस्थानिक श्री. भ. माधवबुवा है आंग्लविद्याविभूषित असून मुंबई विश्वविद्यालयाचे पदवीधर आहेत. यांची निःसंग वृत्ति, सेवापरायणता, उद्योगप्रियता आणि दक्षपणा यांच्यामुळे तर अलीकडे संस्थानचा सर्व कारभार कसा नकाशासारखा रेखीव झाला आहे.. संस्थानचे सर्व व्यवहार एकाद्या यंत्राप्रमाणे चालून श्रींच्या उत्सवासारखे मोठाले उत्सवही कसे बिनबोभाट यथासांग पार पडतात तें पाहिलें म्हणजे पहाणारा घटकाभर थक्क होऊन जातो. त्या वसंत ऋतूंतील परोपरीच्या चंद- नाच्या उटया, निरनिराळ्या पौर्णिमा व अनेक सण, पौष्यांतील टोलेजंग उत्सव, वृक्षछायेंत वसलेल्या चार चार हजार स्त्रीपुरुषांच्या एकजात पंक्ती, श्रीमहाराजांचा घाट, उदबत्या, रांगोळीसुद्धां सर्व थाट, व्याह्याजांवयाच्या पंक्तीप्रमाणे कुरड्या, पापड, मेतकूट बोरकुटासुद्धां सारी तयारी इ. इ. समारंभ ज्याने एकदां पाहिला त्याच्या स्मरणांतून जाणे केव्हांही शक्यच नाही. मठास ठराविक उत्पन्न असे मोठें मुळीच नसून व स्वतः मठाधिपति हेही त्याकरितां विशेष कोणची खटपट करीत नसून येवढा सर्व गाडा अव्याहत चाललेला पाहून श्रीमहाराजांच्या सत्तेची साक्ष पटते व मनास आनंद होतो. मंदिराचा सभामंडप व भोंवतालचे सोपे प्रशस्त असून त्यांच्यावर
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१९
Appearance