Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ श्रीनरसिंहसरस्वती महाराज. फोटो घेण्याचा प्रयत्न केला तो काय दरवेळेस त्याची काचच खराब होऊन जाई, बाबासाहेबही हट्टास पेटले. १०।१५ काचा वाया गेल्या, परंतु फोटो कांहीं निघेना. बाबासाहेबांसारख्या श्रीमंत माणसाने आणलेले काम, आणि कारागीर या नात्यानें असलेला पूर्वीचा स्वतःचा लौकिक यामुळे त्या फोटोग्राफरास अतिशय खेद झाला. तेव्हां शेटजी, तुझी कां वाईट वाटून घेतां हा आमच्या चेहऱ्याचाच गुण आहे, त्याला तुम्ही काय करणार ? आज वेळ नाहीं, येईल एकादे वेळेला. ' असे त्यांचें समाधान करून महाराज परत फिरले. शांत होण्यापूर्वी थोडे दिवस एकदां महाराजांनी आपण होऊन बाबासाहेबांस सांगितलें कीं, 'चला, आपण नौरोजीकडे जाऊं. त्याला त्यादिवशी मोठें वाईट वाटले.' व लागलींच नौरोजीकडे जाऊन त्यांनी स्वतःचा फोटो काढविला. त्याच- वेळीं एकामागून एक असे आसनमांडी घालून बसलेले, उघडा लंगोटीचा, व दरवारी थाटांत बसलेले अशा तीन अवस्थांचे फोटो काढविले. त्यावरूनच आज असलेले सर्व फोटो निघाले आहेत. परंतु प्रतीवरून प्रती झाल्यामुळे मूळच्या सारखेपणांत साहाजिकच फरक पडला आहे, व कित्येक तर अशा विकृत स्वरूपाच्या आहेत की काढणारांची कीव येते. असो. या मूळप्रतीपैकी एक प्रत अण्णासाहेब यांचेकडे आहे. व तीच त्यांच्या पूजाअर्चेची मूळ तसवीर तिच्यावरून दुसरा सुबक फोटो काढावा म्हणून वूट निघाला, व त्यास अण्णासाहेब यांची संमति मिळून रा० माधवराव बापट यांनी कॅमेरा लावला. परंतु काचेवरून फोटो निघणार नाही, तेव्हां त्याची काच दूर केली पाहिजे, असे त्यांचें म्हणणे पडलें. आणि या गोष्टीस तर अण्णासाहेब संमति देईनात. ते म्हणत, ' फोटो निघणार महाराजांच्या इच्छेनें, तेव्हां कांचेशीं तुला काय करावयाचे आहे ? ' काच ठेवूनच काढ परंतु बापट यांनी तर काच काढलीच पाहिजे असा आग्रह धरला. अखेरीस काच काढण्या- विषयों महाराजांची आज्ञा घेऊन काच काढण्यांत आली, परंतु अण्णासाहेब यांच्या शब्दाची प्रतीति दाखविण्याकरतांच की काय, पूर्वीचीच नक्कल पुन्हां घडून आली; - म्हणजे दहाबारा कांचा वांया गेल्या, तरी फोटो निघेना. अखेरीस त्रासून पुन्हा कांच बसविली व फोटो ठेवून दिला. असे सांगतात की, काच बसवितांना जेव्हां खिळे मारूं लागले, त्या वेळी अण्णासाहेब यांची अचलप्रति-