पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्यासाहेब व अण्णासाहेव यांचा संबंध. ९७ क्टर डेव्हिससाहेब हे तात्यासाहेब यांची योग्यता जाणून होते. असा थोर पुरुष फुकट मारला जावा, हें वरें न वाटून त्यांनी तात्यासाहेब यांच्याकरतां मध्यस्थी केली, व सरकारास कळविल्याखेरीज पुण्याच्या बाहेर पाऊल टाका- वयाचें नाहीं, या एका अटीवर तात्यासाहेब यांची सुटका झाली. तात्यासाहेब ही अट पाळतील अशी जामीनकी खुद्द डेव्हिससाहेवानें घेतल्यावरून त्यांना अजीबात सोडून देण्यांत आले. त्यानंतर कांहीं दिवस रोज एक वेळ डेव्हिस- साहेव रायरीकरांकडे जाऊन तात्यासाहेब यांचा शोध घेत असत, परंतु तात्यासाहेब यांनी त्यांस निक्षून सांगितलें कीं, 'साहेब, आतां आपण रोज तसदी घेऊं नये; माझा शब्द केव्हांही खोटा होणार नाही' त्यावरून साहे- बाच्या मागचा त्रास सुटला. पुढे लौकरच नरहरस्वामी समाधिस्थ झाले, व तात्यासाहेब यांच्या अंतःकरणाची तळमळ तशीच राहून गेली. त्यामुळे साधु- संत संन्याशी यांची सद्भावानें सेवा करावी, व कुणा तरी प्रीप्त पुरुषाचा आपल्यावर अनुग्रह व्हावा, त्यांस सहजच वाटे. अशामुळे अनेक खन्या खोट्या लोकांचा सहवास घडल्यावर, व बराचसा अनुभव आल्यावर, महाराज श्रीनरसिंव्हसरस्वती यांची व तात्यासाहेब यांची गांठ पडली, आणि हळू हळू तात्यासाहेब यांची निष्ठा त्यांचे ठिकाण जडली, व त्यांच्याकरतां म्हणून महाराज पुण्यास राहूं लागले. तेव्हां साहजिकच तात्यासाहेब यांच्या परिवारां- तील इतर मंडळींचा व महाराजांचा संबंध जडला. कोर्णाही कर्तृत्ववान् पुरुष कार्य करण्यास निघाला म्हणजे पहिली आवश्यक गोष्ट त्याला अशी होते कीं, होतकरू अशा तरुणांचें मंडळ भोंवतीं जमवावें लागतें. यशापयशाची गोष्ट वेगळी आहे, परंतु माणसाच्या कर्तेपणाची ही खूण आहे. होतकरू अशा तरुणांचे मंडळ ज्याच्या भोवतीं अधिक आहे, व सहज जमतें त्याच्या अंगांत बोलण्या- पलकिडे कांहीं तरी कर्तृत्व आहे, म्हणून खास समजावें. अशाच प्रकारें तात्यासाहेब यांच्या जवळही कांहीं तरुण लोक होते, त्यांतच अण्णासाहेब हे प्रमुख होते. अण्णासाहेब यांचेवर त्यांचा लोभही विशेष होता,, व त्यांच्या गुणांची आणि योग्यतेची पुरी पारख झाल्यामुळे वयानें लहान असूनही तात्या- साहेब यांना बरोबरीच्या नात्यानें वागवीत. अण्णासाहेब यांच्या ठिकाणी राज- खं. ४...७