Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ परिशिष्ट. कारणी पुरुषाची मुळचीच बत्तीस लक्षणे जरी होतीं, तरी देखील त्यांचा योग्य विकास होऊन तीं कार्यक्षम होण्यास तात्यासाहेब यांचा सहवासंच कारणीभूत झाला; किंबहुना मागील एका प्रकरणांतील दृष्टांताच्या भाषेनेंच बोलावयाचें तर असे म्हणतां येईल कीं, ज्याप्रमाणे शिवछत्रपतींचे दादोजी कोंडदेव त्याचप्रमाणे अण्णासाहेब यांचे तात्यासाहेब. राजकारणाचे सर्व प्रकारचें शिक्षण तात्यासाहेब यांच्या अनुभवांसह अण्णासाहेब यांनी त्यांच्यापासून मिळविले; आणि त्यामुळे स्वराज्यांतील मूळ राजकारण आणि अण्णासाहेब यांचा संबंध केवळ ऐतिहासिक नसून एक प्रकारचा जिवंत होता. स्वराज्यांतील मूळ राजकारण, पेशवाईच्या अखेरीस झालेल्या राष्ट्रीय अधःपातामुळे त्याचा झालेला चुथडा, आणि इंग्रजांचे प्रतिस्पर्धी खरें व दिखाऊ राजकारण या सर्वांशी त्यांचा एक प्रकारचा असा सजीव संबंध प्रत्यक्ष आल्यामुळे, अण्णासाहेब यांच्या व तात्कालीन महादेव गोविंद वगैरे इतर पुढाऱ्यांच्या राजकीय वगैरे सर्व विचारपद्धतींत येवढे मोठे अंतर पडले. राष्ट्रीय अधःपातामुळे पानि- पतानंतर मराठ्यांच्या मूळ राजकीय धोरणांत फरक पडून शेवटी शेवटीं तर स्वार्थापलीकडे व स्वसंरक्षणापलीकडे कांहीं राजकीय धोरण म्हणून महाराष्ट्रांत आहे किंवा नाहीं, असे वाटण्याइतकी स्थिति आली, तरी देखील व्यक्तिशः सर्व प्रकारचें शहाणपण ठिकठिकाणी जिवंत होतें, व त्यामुळे खरोखर काय होतें, काय व्हावयास पाहिजे होते, परंतु झाले काय, कसें झालें, काय चालले आहे, व याचे पुढे काय होईल, याचे गणित सोडविण्यास साधन होतें. या साधनाचा उपयोग अण्णासाहेब यांनी नीट करून घेतल्यामुळेच इंग्रज लोकांच्या राष्ट्रीय व राजकीय प्रकृति, आणि स्वकीयांच्या परिस्थितीचें व बलवीयत्साहाचे फार सूक्ष्म ज्ञान त्यांस होतें. त्यांच्यामध्यें व इतर पुढा- व्यांत हाच मोठा फरक होता. केवळ स्वतःच्या अंतःकरणप्रवृत्ति व इंग्रजां- पासूनच मिळविलेले इंग्रजांच्या राष्ट्रीय व राजकीय प्रकृतींचें ज्ञान, आणि स्वकीयांविषयींचें विज्ञान यांत पुष्कळसा लंगडेपणा रहाणारच. असो. तात्या- साहेब यांच्यापासून अण्णासाहेब यांस सर्वांत मोठा फायदा झाला तो हाच. श्रीमहाराजांचें ठिकाणीं विश्वास जडल्यावर तात्यासाहेबांनी अण्णासाहेबांची व त्यांची ओळख करून दिली. महाराजांची गांठ पडल्यावरही तात्यासाहेब यांचे 0