Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट. पर्यंत हिंदुस्थानदेशावर परकीयांचें राज्य आहे, तावत्कालपर्यंत दूध तूप देखील तोंडांत घालावयाचें नाही, असा त्यांचा निर्धार होता. अशा प्रकारें आयुष्य कंठीत असतां त्यांना एक मार्गदर्शकही भेटला. पुण्यास ओंकारेश्वराजवळ पावसाळी स्मशानांत दोन समाधी आहेत. जिच्यावर पत्र्याची छाया आहे, ती श्रीपादस्वामींची, व उघड्यावर औदुंबराजवळ असलेली ती नरहर स्वामींची. हे नरहरस्वामी म्हणजे त्यावेळचें पुण्यांतले मोठेंच प्रस्थ होतें. यांचा अधिकार अतिशय मोठा असून शरीर अक्कलकोटच्या स्वामींसारखें धिप्पाड होतें, व त्या स्वामीप्रमाणें हेहि बहुतेक दिगंबर स्थितीत पिशाच्चवृत्तीनें असत. यांचा स्वभाव फारच तापट व कडक होता, व अक्कलकोटच्या स्वामीप्रमाणेच जें दिसेल तें लहरीप्रमाणे उघड बोलून टाकण्याची त्यांना संवय होती. त्या- मुळे वाटेल तशा वर्तनाच्या स्त्रीपुरुषांची त्यांच्या समोर जाण्याची सोयच नसे. असा त्यांचा सर्वास धाक होता. बंडानंतर थोडेच दिवसांनी म्हणजे शके १७८७ च्या आषाढ व ॥ ४ थींस हे समाधिस्थ झाले. या सत्पुरुषाच्या कृपेनें तात्यासाहेब यांसही योग्य दिशा लागून त्यांनी २॥ वर्षेपर्यंत कांहीं विशेष अनुष्ठान केलें, अनुष्ठानसमाप्तीनंतर त्यांस इष्ट देवतेचें दर्शन होऊन वरप्रसा- दही झाला. परंतु तात्यासाहेब यांस देशाच्या स्वातंत्र्याखेरीज दुसऱ्या कोण- त्याही वराची अपेक्षा नसल्यामुळे त्यांनी अस्त्रप्राप्तीची याचना केली. तेव्हां जगदंबेनें त्यांस खड्ग देऊन आशीर्वादही दिला. परंतु त्याच वेळेस सांगितले की ' याच्या उपयोगाची वेळ टळून गेली आहे, सध्यां उपयोग होणार नाहीं, तरी पण वर दिला आहे, तो पुढे फलद्रूप होईल. तात्यासाहेब यांच्या मनांत अस्त्रसंपन्न होऊन उत्तर हिंदुस्थानांत जावयाचें होतें, व पेशव्यांस हातीं धरून स्वराज्यप्राप्तीसाठी इंग्रजांशी युद्ध खेळावयाचें होतें. अनुष्ठानसमाप्तीनंतर लागलीच त्यांना असे समजले कीं उत्तरेकडील बंडाचा मोड होऊन सर्वच मसलत फसली आहे. तरी पण हिंदुस्थानांत जाण्याचा निश्चय करून ते निघाले. परंतु तेवढ्यांत ती बातम फुटून पंढरपुरास पोहोचतात पकडले गेले. पुण्यास आणल्यावर लष्करी पोहोंचतात तोच ते कोर्टापुढे त्यांची चौकशी होऊन त्यांस तोफेच्या तोंडी द्यावयाचें ठरले. परंतु पुण्याचे त्यावेळचे कले- 0