पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट- श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र अगदी लटक लिहावयाचे म्हटलें तरी त्यांच्याशीं विशेष संबंध असलेल्या कित्येक व्यक्तींसंबंधों निदान चार ओळी तरी लिहिल्याखेरीज ते पुरें झालें, असे कधींच होणार नाहीं. निवळ कोंद- णावरून देखील आंतील खडा काय किंमतीचा असावा, याचा अंदाज करतां येतो; त्याचप्रमाणे एकादें नररत्न ज्या माणसांच्या प्रभावळींत चमकतें, त्यांच्या योग्य- तेवरून देखील त्याचें त्याचें महत्त्व जास्त लक्षांत येतें; म्हणून श्रीअण्णासाहेब यांच्या आयुष्याशीं विशेष संबंध आलेल्या अथवा त्यांच्या तोंडून विशेषपणानें ऐकलेल्या अशा कांहीं थोड्या व्यक्तींची माहिती त्रोटकपणानें द्यावयाचें या भागांत योजिले आहे. श्री. तात्यासाहेब रायरीकर. श्री. अण्णासाहेब यांच्या आयुष्याशीं महत्त्वाचा संबंध असलेले पहिले गृहस्थ श्रीमंत तात्यासाहेब रायरीकर हे होत. तात्यासाहेब यांचे पूर्वज इति- हासप्रसिद्ध सरदार चिंतो विठ्ठल रायरीकर हे वारभाईंच्या कारस्थानांत श्रीमंत दादासाहेब यांच्या पक्षांत असून, स्वजातीयांविरुद्ध इंग्रज सरकारची मदत घेण्याचा धडा राघो भरारींना त्यांनींच शिकविला असे म्हणतात. तात्यासाहेब यांचेही नांव चिंतो विठ्ठलच होतें. आपल्याच नांवाच्या आपल्या पूर्वजानें केलेला हा द्रोह तात्यासाहेब यांच्या अंतःकरणांत अखंड सलत होता; व आपली जहागीर ही स्वजनद्रोहाचें पारितोषक म्हणून ब्रिटिश सरकारने राख- लेली आहे, ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणांस लागून राहिली होती. या थोर पुरुषास अशी सहजच बुद्धि झाली कीं, कांहीं तरी उपायानें कुळास लागलेला हा डाग धुऊन टाकावा; व तेवढ्याकरितां त्यांचे अंतःकरण रात्रंदिवस तळ- मळत असे. उत्तम प्रकारच्या श्रीमंतींत असूनही चितोडच्या प्रतापसूर्याप्रमाणे तात्यासाहेब यांनी आपले आयुष्य केवळ संन्यस्तवृत्तीने घालविलें. तात्यासाहेब यांचा स्वभाव अतिशय स्वाभिमानी, मोठा कडक, दृढनिश्चयी व तेजस्वी होता. एकदां जो निश्चय अंतःकरणानें ठरला तो ठरला. सर्व सुखोपभोगाचा त्याग करून केवळ भुईमुगाच्या आहारावर त्यांनी कडक तपश्चर्या केली. जावत्काल- ●