Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील. ८९ होऊन घ्यावयास प्रारंभ केला, तरच कांहीं होण्याची आशा आहे. असे राष्ट्रीय शिक्षण जर सुरू होईल तर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंध असलेले शिक्षण कोणचें द्यावें, कसें द्यावें, या भाषेंतून द्यावें, की त्या भाषेतून द्यावें, सरकारी शाळांतून द्यावें, कां असहकारी शाळांतून शिकवावें, त्यानें पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवावा, शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी राजकीय चळवळींचा नुसता अभ्या- सच करावा की त्यांत प्रत्यक्ष भाग घ्यावा, स्त्रियांचें व पुरुषांचें शिक्षण सामा- न्यतः एकच असावें, किंवा त्यांत आमूलाग्र फरक असावा, स्त्रियांस शिक्षण किती द्यावें, व कशा रीतीनें द्यावें, शिक्षणाची वयोमर्यादा काय असावी, वगैरे प्रश्न मेळ्यांत गाणे गाणाऱ्या पोरांच्या गोफाप्रमाणे अनायासें समाधान- कारक रीतीनें सुटतील.