इतिहास. इतिहास वाचणाऱ्यांची अशी ठाम समजूत आहे की, शेवटचे बाजीरावसाहेब हा एक अतिशय नादान मनुष्य असून, त्यानें इंग्रज सरकारास मराठी राज्याची देणगी देऊन टाकली. हा समज चुर्काचा आहे, असे जर सांगू लागले तर आजकाल कोर्णाही खरें मानणार नाहीं. कारण इतिहासाची उपलब्ध साधनें म्हणजे इंग्रज लोकांचे ग्रंथ, सरकारी कागदपत्रे आणि आमच्या इकडील लेखी माहिती यांपैकों कोठेंही हा समज चुकीचा आहे असे आढळत नाही. बाजीराव हा नादान मनुष्य होता किंवा कसे हा प्रश्न मोठासा महत्त्वाचा नाहीं. तो व्यसनाधीन असला, तरीही कोणत्याही मोगल बादशहापेक्षां अनेक पटीनें बेतांत होता. दुर्बळ होता, असा दोष जर काढला तर स्वराज्यांतील सरदारांचें, प्रजेचें आणि सेनेचें, पाठचळ असते तर त्याचा दुर्बळपणा कांहीं नुकसान करूं शकला नसता. स्वाभिमानशून्य म्हणावा तर सरदारांनी खाऊन टाकण्याची वेळ आणल्यामुळेच त्याने इंग्रजांस घरांत घेतलें, हे उघड आहे. आणि केव्हांही ही चूक त्याला जाचतच होती. म्हणून जेव्हां पहावें तेव्हां या इंग्रजी मगरमिठींतून सुटण्याची धडपड करीत असतांना तो दिसतो. सरदार लोकांनी फितूर होऊन त्याला सोडून दिलें होतें. दगलबाजीच्या लाक्षागृहांतच त्याला रात्रंदिवस निजावें लागत होतें, हेंही उघडच आहे. अशा स्थितीत लासून जाऊन, " नको ही दगदग आणि राजवैभव, यापेक्षां 'हरी हरी करीत निर्भयतेनें दिवस काढणें बरें, " असें त्यास वाटत असल्यास नवल नाहीं; व त्यामुळे ' त्यानें राज्याची सोडचिठ्ठी दिली, ' या भाषेवर चटकन् विश्वास बसतो. त्यानें सोडचिठ्ठी दिली नसून येथेंही कांहीं उमीचंदी झाली आहे, असे सांगितलें तर ते कोणास खरेंही वाटणार नाही. यासंबंधी बारकाईनें पुरावा गोळा करून अण्णासाहेब यांनी असे ठरविलें होतें कीं, ही समजूत वस्तुस्थितीस सोडून आहे. बाजीरावसाहेबांस लबाडीच्या जाळ्यांत गुंतवून तह करण्यास मालकम् साहेबानें कसें भाग पाडलें, याचें मोठें वर्णन चित्रमय जगतूच्या एका अंकांत आले होते, परंतु तह करण्यास प्रवृत्त करण्यापुरतीच ही लबाडी होती, असे त्यावरून चाटते. त्यानंतरही वस्तुतः केवढा व्यूह झाला, याची O
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०२
Appearance