Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय शिक्षण. असत, या पौराणिक कथेचा उल्लेख या ओवीत आहे. धान्याची ही अद्भुत वाढ अर्थातच मंत्रसामर्थ्याने होत असे. ऋषींना कांहीं खावयास कमी होतें, अथवा असल्या शेतीवरच त्यावेळी समाजाचा निर्वाह असे, असा मात्र याचा अर्थ नाहीं. व तेवढ्या करितां या कथेवर absurd म्हणून शेरा मारण्याचेंही कारण नाहीं. स्वतःचें मंत्रवल अथवा तपोबल किती कायम आहे, हें अजमा- वण्याचा हा एक प्रयोग होता, व त्यामुळे ज्याचा त्यास आपला हिशेत्र सम- जून येई. सहस्त्रार्जुनाकडे लक्ष गेल्यावरोवर रेणुकेच्या डोक्यावरील फडक्याच्या मोटेतून पाणी गळू लागले, ग्रांतीलही भावार्थ हाच आहे. सामर्थ्य प्रयत्नांनीं अव्याहत टिकवीत असत, व तसें तें टिकलें आहे की नाहा, हें अजमावण्या- करितां असले प्रयोग होत असत. परंतु अशा तऱ्हेची कसलीही कसरत करणें हैं आजकाल कमीपणाचें दगदगीचें अथवा विक्षिप्तपणाचें वाटतें.” असो. ८८ यावरून शिक्षण म्हणजे निव्वळ माहिती अथवा पोटापाण्याचा धंदा व तें मुलगा कांहीं वयांत आल्यानंतर द्यावयाचें अशी जी घातुक कल्पना होऊन बसली आहे, तिनें किती अनर्थ केला आहे हे लक्षांत येईल; आणि जर कोण- च्याही चळवळी आंग धरून यशस्वी व्हावयाच्या असतील, ज्यास शिक्षण म्हणतां येईल अशा तऱ्हेची शिस्त इतरांस लावण्याचा व तेथें ती फलद्रूप व्हावी म्हणून स्वतःच ती लावून घेण्याचा उद्योग सुरू झाल्याखेरीज, व तोही घरोघरीं लहानपणापासूनच विद्यार्थ्यास लावल्याखेरीज राष्ट्रीय विद्यालयें हीं यथार्थ रीतीनें नामसार्थ होणार नाहींत. यांत कांहीं ज्यांनी तीं विद्या- लयें आज काढली आहेत, अथवा जे तीं चालवीत आहेत, त्यांचा दोष आहे, अथवा त्यांच्या प्रयत्नांची योग्यता कमी करण्याचा रोख आहे, असें . मात्र नाहीं. हा संबंध समाजाचा दोष आहे, व सर्व समाजाच्या पापामुळे अशा कांहीं प्रशंसनीय व्यक्तींच्या तपस्याही कशा वाया जातात, हेंच दाखविले आहे. सारांश इतकाच आहे कीं राष्ट्रीय शिक्षणाशिवाय देशाचा तरणोपाय नाहीं, व शिक्षण हे कौटुंबिक जीवनाशी नित्यसंबद्ध केल्याखेरीज खरें राष्ट्रीय शिक्षण मिळणार नाही, आणि असें राष्ट्रीय शिक्षण केवळ विद्यार्थ्यांनींच नव्हे, तर स्त्रीपुरुष, बाल, तरुण, वृद्ध, ज्या ज्या कोणास खरेंच कांही देशाविषयीं वाटत असेल, त्या सर्व वयाच्या सर्व जातीच्या आणि सर्व दर्जांच्या लोकांनी आपण