पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नुसते मनांत नको; कृति पाहिजे. अहंकारांत अथवा गर्वांत रूपांतर होता कामा नये, आणि कशावरही तिनें अशा रीतीनें ' ममता ' स्थापिणें योग्य नाहीं. १ ८७ अशा रीतीनें व्यवस्थितपणें अंतःकरणाची जी वाढ तिचें नांव शिक्षण. असा अहंकार तर असावा, परंतु गर्व आणि ममता नसावी, अशा दोन विरोधांचा समन्वय करण्याची खुवी अशी आहे की, जेथे केवळ स्वतःच्या व्यक्तीचा प्रश्न असेल, तेथे अगदी एका गालफडींत मारली असतां, दुसरा गाल पुढे करण्याइतकी लीनता, आणि अहिंसा, क्षमा वगैरे कोमलवृत्ति परिपूर्ण असावयाच्या, आणि जेथें सामाजिक प्रश्न असेल, तेथें मात्र त्याच्या अपेक्षेने अहंकारादि कठोरवृत्ति 'अपि भज्येद- पर्वणि ' अशा रीतीनें बाळगाव्या, म्हणजे मनुष्याची स्वतःची सर्व तऱ्हेनें परि- पूर्ण वाढ होते. पूर्णत्वाचें खरें रहस्य अपूर्णतेने वागण्याची भीति नसणे, अथवा अट्टाहास नसणे, असल्या सहजतेमधेंच आहे; आणि यामुळेच 'ब्रञाददि कठो- राणि मृदूनि कुसुमादपि,' असले लांकोत्तरतेचे नमुने पहावयास मिळतात. चुट- कसिरसे दोन दोन कोटींचे खेळ करणाऱ्या आणि मानधनास विष्टेसारखें लाथाडून टाकणाऱ्या अण्णासाहेबांनाही घराचा तंटा चालला असतां स्वतः पुढे होऊन ' बांध पाहूं भिंत, कोण काय करतो पाहूं दे, ' असें आवेशानें म्हणून त्याप्रमाणे ती बांधून घेण्याच्या हट्टास पेटलेले पाहून कोणास मौज वाटणार नाहीं ? परंतु असल्या तऱ्हेचें बाह्य आचाराविषयीं साभिमान राहणे, अर्वाचीन संभावितीस कसेसेंच वाटतें आणि क्वचित् प्रसंगी तसला प्रसंग उप- स्थित झालाच तर शरीरास त्याचें वळण नसल्यामुळे, साराच 'क्षीण नराचा कोप' होऊन जातो. याविषयीं ते नेहमीं म्हणत असत कीं " नुसतें मनांत असून कांहीं उपयोगी नाहीं बाबा; शरीरास त्याचें वळण असावें लागतें. तरच तें ऐन वेळास कामास येतें. असलेली गोष्ट देखील ऐन वेळां बाहेर काढीन, असें म्हणून नुसतें भागत नाहीं, यत्नपूर्वक ती टिकवावी लागते. श्रीगुरुचारित्रांत " पूर्वी ऋषीमुनीं सकळीं । नित्य पेरूनी पिकविती साळी । ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी । महातपस्वी पुण्यपुरुष ॥ ( १३ अ. ६५. ). म्हणून सांगितले आहे, त्यांतील आख्यायिकेंत हाच भाव आहे. स्नानास जातांना ऋषी धान्य पेरीत जात असत, आणि परत येतांना पीक गोळा करीत येत "