पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ राष्ट्रीय शिक्षण. विसंगत आहे असेंही नाही. वेदांतांतील निरहंकारिता आणि भागवत धर्मा- तील लीनता यांचा विपर्यास केल्यामुळेच हल्लींची तेजहीन स्थिति उत्पन्न झाली. मनुष्याच्या कणाकणांत ' हें काम मी केले पाहिजे, ' अशी जी स्फूर्ति भरून राहते, तिचें नांव 'अहंकार. ' अंतःकरणानें ठरलेले कर्तव्य करण्यास जणूं काय शरीरांतील कणाकणानें ' हे मी आधीं करतों,' अशा चढाओढीनें उत्सुकता दाखविणें, याचें नांव अहंकार ही एक अंतःकरणाची शक्ति आहे, व ती नसली तर मनुष्याच्या घटनेंत व्यंग उत्पन्न होऊन, तो अपंग होऊन जातो. अहंकार, अभिमान, अहंमति वगैरे शब्द हे सारेच एकमेकांचे पर्याय समजले जातात, परंतु वेदांतांत व इतर ग्रंथांतूनही ते कोठें कोठें पर्याय म्हणून तर कोठें कोठें त्यांच्यांतील सूक्ष्म फरक लक्षांत घेऊन वेगवेगळ्या अर्थानें योजिलें असल्यामुळे असा घोंटाळा उत्पन्न होतो. याविषयों एके ठिकाणी त्यांची स्वतंत्र टीप सांपडली ती अशी:- ५८ दूष्य किंवा दुष्ट अहंकार म्हणजे गर्वाच्या अर्थी हा साक्षेप म्हणजे द्वैतयुक्त म्हणजे अन्य व्यक्तींच्या संबंधानें असतो. म्यणून त्याला त्याज्य, गर्ह- णीय, मद आणि मत्सर यांची जोड मानून 'विकार' असे मानण्यांत येतें. परंतु देवाच्या किंवा श्रींच्या ठिकाणीं गर्व असणें संभवत नाही. त्याचप्रमाणे काम क्रोधाधिक मनोवृत्ति विकार म्हणून संभवत नाहीत. कारण दुसरी व्यक्तीच त्यांच्याशिवाय नाहीं. अंतःकरण चतुष्टयांतील अहंकार, स्वतंत्र ही शक्ति आहे, गर्व नव्हे.”—३०-७-१९०९. जेणेकरून इतर मानव जातींहून मनुष्य आपणास वेगळा काढतो, व स्वतःच्या अपेक्षेनें इतरांस कमी लेखतो, अशा प्रकारची जी स्वतःविषयीं वृत्ति, त्या अर्थाने अहंकार, अभिमान, गर्व, इत्यादि शब्द दुष्ट मानले गेले आहेत. किंवा वेदांतांतील अत्युच्च आणि अति सूक्ष्म सीमा सांगण्याकरितां 'अस्मिते'लाही जडांत आणि वृत्तांत काढून निर्वि- 'कल्पतेची खूण दाखविली जाते, तेथेंही अहंकार शब्दाचा निषेध केला आहे. परंतु हे दोन विशेष अर्थ जर सोडले, तर असे दिसून येईल कीं, अहंकार ही अंतःकरणांतील स्वतंत्र शक्ति असल्यामुळे मनुष्याची पूर्ण वाढ होण्यास इतर शक्तबिरोबर तांही योग्य प्रमाणांत वाढलीच पाहिजे. आणि या स्फूर्तीस व्यक्त स्वरूप येण्याकरितां कांहीतरी बाह्य गुणकर्मसंस्कार इत्यादि उपाधींशीं ती चिकटून असली पाहिजे; मात्र एवढेंच कीं वर सांगितल्याप्रमाणे तिचें दूष्य