पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रधर्म व अहिंसा. ८५ तरी, ती सर्वत्र एक विचार भरूं शकत नाही, व तिच्यांत परंपरा उत्पन्न करण्याचें सामर्थ्य नसतें. तत्त्वावरील आपल्या प्रेमामुळे सर्व तऱ्हेची क्रिया निर्माण झाली पाहिजे, परंतु असे होत असतां, त्या प्रेमामुळेच दुसऱ्याचा द्वेष अथवा त्याच्या अंतःकरणास दुखविणे घडणार नाहीं अशा तऱ्हेची मनोभूमिका म्हणजे महाराष्ट्र धर्म. मात्र याचा अर्थ असा होत नाहीं कीं, दुसऱ्यास दुखवावयाचें नाहीं, एक या अहिंसा धर्माचें फाजील स्तोम करून, कोणी एक गालांत मारली तर दुसरा गाल पुढे करावयाचा, अगर आपल्या कुटुंविर्नावर कोणी बलात्कार करूं म्हणेल तर त्यास सत्रंजी घालून द्यावयाची. महाराष्ट्र धर्म हा वस्तुतः मनुष्याल शूर व कर्तृत्ववान असा बनवितो; कारण प्रेम आणि कर्तव्य यांच्या पुढें भय टिकतच नाहीं, आणि यांच्या इतका जोर दुसऱ्या कशांतही नसतो. परंतु अहिंसेचें फाजील स्तोम सामान्यतः माणसास पंगु व नामर्द बनविणारे आहे. परंतु कर्तव्य हे सर्व तऱ्हेच्या विरोधाचा सम- न्वय करितें. अहिंसा, द्वेष, प्रेम वगैरे मनोवृत्ति अंतःकरणाच्या आहेत, व शौर्य, पंगूपणा, प्रतिकार वगैरे क्रिया त्या सर्वांपासून बाहेर सारख्याच उत्पन्न होऊं शकतात. त्या क्रियांचा प्रश्न नाहीं, अंतःकरणाचा आहे. कोणत्याही तऱ्हेचा द्वेष अंतःकरणांत नसतांना, काम पडल्यास स्वतःच्या हातानेंच, आडवें आलें कीं कापून काढावें लागतें. सैन्यांतला शिपाई Fire म्हटल्या. बरोबर गोळी सोडतो, तेव्हांही त्याच्या मनांत केवळ कर्तव्यावरील प्रेमच असतें. त्याप्रमाणे काम पडल्यास, शरीररक्षणार्थ शस्त्रक्रिया जशी अवश्य आहे, तसेंच समाजरक्षणार्थ भीषण क्षात्रकर्मही करण्यास तयार असणे, माणसाचें कर्तव्यच आहे. मुद्दा एवढाच आहे कीं, अंतःकरणांतील दृढप्रेमांतून क्रियेचा उदय झाला पाहिजे; व तत्त्वाविषयों अथवा वस्तूंविषयीं अशा प्रेमामुळे जो अभिमान उत्पन्न होतो, त्याच्याच योगानें मनुष्यांत शौर्य उत्पन्न होतें. हा केवळ शब्दच्छल वाटेल परंतु तसे नव्हे. चळवळीवरील चळवळ करणाराचा अभिमान किती क्षीण असतो, व त्यामुळे तिच्याशी त्याचें जीवन एकरूप कसें होऊं शकत नाहीं, हे दाखविण्याकरितां इतकी फोड करणें अवश्य होतें. सारांश गोष्ट एवढीच आहे कीं, कांहींतरी विशिष्ट गुणसंस्कार ( नुसते गुण नव्हेत ) यांच्या ठिकाणी अभिमान उत्पन्न झाल्याखेरीज शिक्षणास राष्ट्रीयता येणार नाहीं. असा अभिमान उत्पन्न होणे, हें वेदांताच्या अगर भागवतधर्माच्या तत्त्वास