पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ राष्ट्रीय शिक्षण. तेजस्वी व्यक्तींच्या अनेक लहान लहान अभिमानांचा समुच्चय म्हणजे राष्ट्र- जागृति; अनेक लहानसान अभिमान कितही वाढले तरी व त्यांनी एकमेकांशी कशाही कुस्त्या केल्या तरी ते एकमेकांस मारून टाकणार नाहीत; उलट एकाच आखाडयांतील तालीमबाजांप्रमाणे एकमेकांचें बल वाढवितील, असा त्यांत जो एकसूत्रीपणा असतो, त्याचेंच नांव 'महाराष्ट्रधर्म' श्रीसमर्थांनी ' मराठा तितका मेळवावा' म्हणून महाराष्ट्र धर्माचें लक्षण सांगतांना कांहीं एकंकार शिकविला नाहीं, तर उलट ज्याने त्यानें आपणास शहाणे करावें. व सर्वांनी मिळून देशद्रोही कुत्ते मारून परते घालण्यास शिकावें, असेंच शिकविलें आहे. ही गोष्ट एकाच रीतीनें साध्य आहे. मराठा तितुका मिळवून एक विचारानें भरावा, म्हणून समर्थांनी सांगितलें; आमचे लोकही आज ह्याचीच इच्छा करीत आहेत परंतु ' एक विचार' मात्र कोणांतच भरला जात नाही. याचे कारण सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असतां महाराष्ट्र धर्माचें मुख्य अंग आम्ही विसरून गेलों. श्रीगुरुचरित्र या ग्रंथावर अण्णासाहेब यांचे फार प्रेम होतें, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. ज्यामध्ये परकी भाषेतील एकही शब्द नाही, असा हा ज्ञानेश्वरीनंतर भर मुसलमानींत निर्माण झालेला असा एकच ग्रंथ आहे. समर्थांनीं उपयोगांत आणलेला 'महाराष्ट्र धर्मं ' हा शब्द प्रथमतः या ग्रंथांत आलेला आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. 'महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ? ' असे मी त्यांना विचारले असतां सर्व गोष्टींस श्रीगुरुचरित्रांतून आधार काढून देण्याच्या त्यांच्या नेहमींच्या पद्धतीस अनुसरून त्यांनी चटकन् सांगितले की ' अरे, महाराजांनीच श्रीगुरुचरित्रांत हा शब्द योजिला आहे; व तेथेच त्याचें सूत्रमय लक्षण सांगून टाकले आहे. श्रीगुरुचरित्र अध्याय पन्नास, ओवी १३५, " ऐसा हा राव असतां । महाराष्ट्रधर्मी वर्ततां । आपुला द्वेष तत्वतां । न करील की जाण पां "॥ यांत महाराजांनी महाराष्ट्र धर्माचें मुख्य लक्षण सांगून ठेवले आहे. असे म्हणून त्यांनी बरेंच भाषण केले. त्याचा सारांश एवढाच आहे कीं ' कोणच्याही गोष्टीचा उगम प्रेमांतून झाला पाहिजे, द्वेषांतून होतां कामा नये. कुणाचा द्वेष करावयाचा नाहीं, व द्वेषाकरितां कोणतीही गोष्ट करावयाची नाहीं, हाच महाराष्ट्र धर्म प्रेम म्हणजै निरपेक्ष कळवळा, द्वेषामुळे उत्पन्न झालेली चळवळ जोरदार असली