Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कौटुंबिक जीवनाचे महत्व. ८३ मिळत असली, तरी शिक्षण असे बहुतेक मिळतच नाहीं. आणि तसे तें मिळाल्याखेरीज तर राष्ट्र सजीव होऊन वर येणे शक्य नाही. थोडक्यांत बोलावयाचें म्हणजे विचारवान् पुरुषांनी अतिविचारता व प्रत्युत्पन्नकर्तृत्व यांचा भ्रम टाकून देऊन, संकुचित अभिमान धरावयास तयार झाले पाहिजे, म्हणजे गुण- संस्कारांची थोडीबहुत कांही तरी प्रत्यक्ष कमाई केली पाहिजे, व आपल्या जीवाचे कोड अथवा कींव न करितां अखंड त्या शिस्तीत स्वतःस घालून घेतले पाहिजे, म्हणजे तें शिक्षण कुटुंबास मिळून मोठ्या शिक्षण- संस्थांचा राष्ट्रीय दृष्टया फायदा घेण्याची पात्रता पुढील पिढींत येईल. नुसत्या उत्तम विचारांनीं, अगर शिक्षणसंस्था व्याख्यानें आणि वाङ्मयसाधनें यांत पोरास वुडवून ठेवल्यानें कांहींही व्हावयाचें नाहीं. सारांश समाजघटकांची खाजगी रहाणी व माणसांचें कौटुंबिक जीवन यांचे महत्व ध्यानांत घेऊन तेथपासून जेव्हां कोणच्याही चळवळीस सुरुवात होईल, तेव्हां कार्य होऊं लागेल. मनुष्याची चळवळ वेगळी व त्याचें खाजगी जीवन वेगळें, अशी फार- कत झाल्यानेंच साऱ्या चळवळी निर्वीर्य होऊन मरून जातात. 0 दुसरी मोठी अडचण म्हणजे, जुनें आणि नवें यांचा तंटा, जीवनकलह, दारिद्र्य, राजकीय परिस्थिति, इत्यादि गोष्टींच्या भाऊगर्दीत शिरल्यावर मनु- ष्याच्या विचाराचा पत्ताच लागत नाहीं; अशा स्थितीत स्वतःच्या राष्ट्रीय- त्वाची निश्चित कल्पना करून, तिला सुसंगत असे गुणसंस्कार भोंवतालच्या परिस्थितीत अंगी आणावयाचे, व परिपाळावयाचे, ही गोष्ट सर्वांसच कशी साधेल ? स्वतः अण्णासाहेब देखील म्हणत असत कीं, “ हे काम फार कठीण आहे, महाराज स्वतःच अवतार घेऊन तें करतील, तेव्हांच सारी अव्यवस्था मोडली जाईल. " असे जरी असलें, व एकादा अवतारी महा- पुरुष पुढे येईपर्यंत हे जरी साध्य नसले, तरी तोपर्यंत एक गोष्ट करणें आमचें कर्तव्य आहे, असे ते म्हणत असत. ती ही कीं सर्व तऱ्हेची गुण- संपत्ति आंगीं आणावी, आणि जुने संस्कार व परंपरा या जिवंत ठेवण्याची खटपट करावी; मग तेवढ्याकरितां वाटेल त्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरी हरकत नाहीं, त्यांत भूषणच आहे. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या जातिकुलशीलानुरूप सहज प्राप्त होणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात की, वरील रीतीनें त्यांचे परिपालन करून महाराष्ट्र धर्म त्याला वाढवितां येईल.