Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ राष्ट्रीय शिक्षण. गोष्ट लक्षांत घेऊन, तशाच तऱ्हेची राहणी आमच्या इकडील जाणत्या लोकांनी बनवून दिली होती. शिक्षणांतील हा खरा हेतु लक्षांत घेतला असतां असें आढळून येईल की हल्लींच्या कोणत्याही शिक्षणपद्धतींत शिष्याची पूर्वीची कांहीं तयारी नसतां हा हेतु साधणे शक्य नाही. कारण या शिक्षणपद्धतीच्या कक्षेत तो पुरा येईपर्यंत शरीरांतील या दोन संस्थांची वाढ होऊन गेलेली असते. वर सांगितल्या प्रमाणे शिक्षणांतील खन्या हेतूची वासलात त्या पूर्वीच्या वयांतच लागून जाते. जर कर्मधर्मसंयोगानें त्या जीवाच्या बाबतीत हे थोडेंबहुत घडून आले असले, तर मात्र त्यास वाढवून विशिष्ट रूप देण्याचे काम हें शिक्षण पडूं शकतें. त्यामुळे जेथें ही मूळ तयारी घडते, तेथेंच खरोखर काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्या विचारवान् गृहस्थास आपल्या मुलास राष्ट्रीय शिक्षण द्यावेसे वाटत असेल, त्यानें स्वतःच्या वरासच राष्ट्रीय शाळा बनविले पाहिजे, आणि डोळे उघडूं लागतांच आपल्या पिलांस दयामाया न करतां तिच्यांत घातलें पाहिजे. परंतु त्या शाळेत घालून सर्व तऱ्हेची नुसती माहिती त्याला देऊन अगर कानाशीं अष्टी प्रहर बडबड करूनही हें साघणार नाही. उलट मुलांच्या कानीं वाटेल तशी आणि वाटेल तितकी बडवड केल्यानें, त्यांच्या क्रिया- शक्तीची वाफ निघून जाते, व विरुद्ध परिणाम मात्र घडून येतो. परंतु शिक्ष- णाचा हा हेतु लक्षांत ठेवून, अथवा न ठेवूनही कां होईना, वरील इंग्रेजी उताज्यांत सांगितल्याप्रमाणे वागण्याची शिस्त ज्यांना लागलेली आहे, व स्वतः ज्यांच्याजवळ कांहीं गुणसंस्कारांची कमाई आहे, तेच योग्य गुरु होऊन सहज रीतीनें शिक्षण देऊं शकतात. अशा तऱ्हेनें घरोघरीं मनुष्यत्वाचें शिक्षण घेतलेली प्रजा जेव्हां एकत्र होते, तेव्हां त्यांच्या क्रियाशक्तीला त्यांच्या स्वभावानुरूप निरनिराळी वळणें देऊन तदनुरूप ज्ञानाचा पुरवठा कर- ण्याचें काम मात्र सर्व प्रकारच्या शिक्षणसंस्था करितात. अशी वस्तुस्थिति असतां, शिक्षण म्हणजे कांहीं तरी विषयांच्या माहितीचा संग्रह व तें मुलगा कांहीं तरी वयांत आल्यावर त्याच्या कानाशी कटकट करूनच दिले जाते, त्याचा देणाऱ्यांच्या व्यक्तित्वाशी कांहीं संबंध नसतो, व तें देण्याची कांहीं विशिष्ट पद्धतीही नाहीं, अशा त-हेच्या मुकाट्यानें सर्व संमत झालेल्या एक प्रकारच्या समजामुळे राष्ट्रांतील नवीन पिढीस कसल्याही प्रकारची कितीही माहिती