Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षणाचा खरा हेतु. ८१ पणाने जुनें अंतरलें आणि पारतंत्र्यामुळे नवीन पारखे झालें, अशी स्थिति उत्पन्न झाली आहे. जुन्या सुइणी मरून गेल्या, आणि नवीन तऱ्हेनें इस्पि- तळांत वाळंतपण करणे तर पटत नाहीं, अशा स्थितींत बाळंतीणच मरून जावयाची पाळी आली आहे. एकाद्या विषयांत थोडासा व्यासंग केला अथवा पुष्कळशा विषयांचा चांवा घेऊन पाश्चात्य पंडितांची ठराविक विचारसरणी पाळली, की मनुष्याच्या आयुष्याशी संबद्ध असलेल्या सर्व विषयांत अकुंठित संचार करण्याची बुद्धीस पात्रता येते, त्यामुळे जें लहरीस येईल तें शास्त्र आणि जी सोयीस पडेल ती शास्त्रीयता असे होऊन बसल्यावर राष्ट्रीयत्वाची नुसती चाळणी व्हावी हैं ठकिच आहे. असल्या या चाळणीत कितीही चैतन्यप्रवाह ओतला गेला तरी एक थेंबही कसा सांचेल ? या सर्व गोष्टींची थोडीबहुत जाणीव सर्वत्रच आहे. व अशा तऱ्हेनें होणारी चूक भरून काढण्याचे थोडे बहुत प्रयत्नही आहेत; परंतु एक तर अशा राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत अशी सुनिश्चितता आणणे दुर्घट झाल्यामुळे व शिक्षण शब्दाची व्याख्यांच मुळी बदलून गेल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाचीच एक सुधारलेली आवृत्ति व्हावी यांत नवल नाहीं. या शरीरांतील Nervous system ( ज्ञानतंतुजाल) म्हणजे खरा मनुष्य स्नायुमय शरीर आणि स्नायुबल याची व त्या Nervous system ची जर उत्तम जोड असली तरच मनुष्य म्हटला म्हणजे आपल्या मनांत ज्या जोमदारपणाची, कर्तेपणाची आणि प्रभु- तेची कल्पना येते, अशा तऱ्हेचा मनुष्य तयार होतो. त्यामुळे Nervous system आणि Muscular system यांचा असा परस्पर जोड घालून देऊन त्या वाढतील अशाच तऱ्हेचें ज्ञान व वळण त्यांना देणें हा सर्व शिक्ष- णाचा हेतु आहे. नवीन रोपट्याला कांहीं काळ कुंड्यांत ठेवून खत, पाणी, वारा, ऊन वगैरे सर्व विशिष्ट तऱ्हेनेच यावें लागतें, तरच त्याची योग्य वाढ होते. त्याचप्रमाणें मनुष्याची अशी वाढ होतांनाही घडावें लागतें. नाही तर Nervous system आणि Muscular system यांच्यांत विस्क- ळितपणा होऊन हल्लींच्या समाजासारखी विचित्र मानवसृष्टि उत्पन्न होते ही खं. ३...६