Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय शिक्षण. सारांश काय, असले सर्व उदात्त गुण अंगीं असावें, आणि त्यांच्या जोडीस जेणेंकरून जगांतील इतर जनसमाजाकडून आपलें विशिष्टत्व कायम राहून, त्यामुळे मानवसृष्टीत कांही स्पष्ट विशिष्ट कार्य करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्व संस्कारास अभिमान चिकटून असेल, तरच तिला राष्ट्रीय भावना म्हणतां येईल, व त्या अभिमानाच्या जोपासनेंतच राष्ट्रीयत्व आहे. अशी राष्ट्रीय शब्दाची सामान्य व्याख्या आजच्या घटकेस करतां येईल. मग व्युप्तत्तिशास्त्र - दृष्टया कोणी कितीही तर्क बसकोत. या ठिकाणी संस्कार हा शब्द मानसिक परिणाम, व गंध लावणें, स्नान करणे, माळ अथवा जानवें घालणें, गुडधे टेंकूनच नमाज पढणें अथवा अंगावर पाणी शिंपडून घेऊन पवित्रात्म्यानें शुद्ध होणें असली प्रत्यक्ष लहान मोठी क्रिया असल्या दोनही अर्थानी वापरला आहे. आजकाल जी जागृति उत्पन्न होत आहे तिच्यांत उत्तम गुण उत्पन्न व्हावे, असा स्तुत्य प्रयत्न आहे. परंतु त्याला समाधानकारक यश न येण्याचे कारण हैं आहे कीं, असा कांहीं विशिष्ट संस्काराचा अभिमान उत्पन्न केला जात नाही किंबहुना असा अभिमान असणें हें कोतेपणाचें व वेडगळपणाचें समजले जातें; परंतु कोणत्याही संघटनेंतील खरा जोम असल्या वेडगळपणांतच असतो; तत्त्वां- च्या बारकाईनें इच्छाशक्तीची वाफ निघून जाते. या गोष्टीच्या अज्ञानामुळे व कांहींसें, जरी ही गोष्ट पटली तरी, हल्ह्रीं जिकडे तिकडे झालेल्या अनवस्थेमुळे, सर्वांस पटतील असे संस्कार कोणते घ्यावे, याचा निर्णय करितां येत नसल्या- मुळे, असल्या संस्कारच्या अभिमानाच्या अभावी उत्तम गुण प्रौढ पिढीच्या अंगीं खेळत नाहींत, आणि म्हणून नवीन पिढ्यांत त्यांचें परिवर्तन व उत्पत्ति होत नाही. कार्यवंशात् कोठें कांहीं गुण चमकतात, ते त्या कार्यास धरून असल्यामुळे, तत्क्षणीच विजेप्रमाणें मालवून जातात. पयाळनाथांनी म्हटल्या- प्रमाणे ' निशाण फडकें तें काष्ठ । त्याचें मोल काय | पार त्या अभिमानासाठी रायाचें शिर जाय ॥ " यांत सारें रहस्य आहे. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचेच संस्कार बनवून त्यांच्या ठिकाणीं ' रायाचें शिर जाय ' असला अभिमान धर- ल्यानॅच राष्ट्रचैतन्य उत्पन्न होतें, व राष्ट्र जगतें. नुसत्या गोल गोल गोष्टीनें कांहीं देखील होत नाहीं. परंतु, संभावितपणाच्या विचित्र कल्पनांमुळे असल्या तऱ्हेचें वर्तन आपल्या योग्यतेस कमीपणा आणणारें वाटतें, अगर सर्व प्रकारच्या अर्धवट पांडित्यानें कशांतच कांहीं वाटत नसल्यानें अतिशहाण-