पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीयत्व म्हणजे काय ? याचे आहे, त्यास लागणारें शौर्य थोडेबहुत उत्पन्न होतें. परंतु राष्ट्रीयत्वास लागणाऱ्या अनेक गुणांपैकी जरी तो विनमोल असला, व त्याच्या योगानें व्यक्तीची किंमत कितीही वाढली, तरी त्यांना कांहीं संस्काराची जोड असल्या- खेरीज त्याची राष्ट्रीयत्वास मदत होऊं शकत नाहीं. सारांश, गुण आणि संस्कार या उभयतांची मिळून जेव्हां एकादी विशिष्ठ मूर्ति ठरते, तेव्हांच तिच्या ठिकाणी राष्ट्रीयत्व येऊं शकतें. उदा० एकादा मनुष्य कितीही शूर मुसलमान होऊं शकणार नाहीं; त्या असला तरी तेवढ्यानें तो शौर्याचा अभिमान कुराणास व पैगंवरास चिकटून असेल, म्हणजे अर्थातच त्यांच्या अनुषंगानें मुसलमानी समाजास धरून असेल, तरच त्याला मुसलमान म्हणता येईल. मुसलमानांचेही राष्ट्रीयत्व इस्लामी धर्माशीं चिकटून असल्यामुळे धर्माशी चिकटून असणें हेंच त्यांच्या राष्ट्रीयत्वाचें लक्षण झालें, इंग्लिश लोकांचें राष्ट्री- यत्व ख्रिश्चन धर्माशीं चिकटून नसल्यामुळे, इंग्लंडच्या राजकीय हिताहितास एकरूप असणे, आणि ज्या कित्येक गोष्टींमुळे जगांतील इतर युरोपियन लोकां- हून इंग्लिश मनुष्य आपला वेगळेपणा कायम राखूं शकतो, त्या गोष्टी म्हणजे आचार, विचार, आणि गुण हे अंगी असणे, यांतच त्यांचे राष्ट्रीयत्व आहे; मग तो माणूस कोणच्याही धर्माचा असो. या विशिष्टपणांत आनुवंशिकतेलाही एक स्थान असल्यामुळे इंग्लंडांत इंग्लिश म्हणविणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्म येणे, हाही एक संस्कार अवश्य आहे. असो. ७९ सारांश काय देशजागृतीकरितां धैर्य, साहस वगैरे जे कांहीं गुण यावे असे आपणांस वाटतें, ते तर वस्तुतः मनुष्यत्वाला आवश्यक आहेत. त्यांच्या योगानें फार झालें तर यथार्थ मनुष्यत्व येईल. या गुणांचा उपयोग हिंदुस्थान देश म्हणून आज ज्याला समजतात, अथवा समजण्यांत येईल, त्याच्या व त्याचा घटक या नात्याने स्वतःच्या हिताहितसंबंधांतच करूं असें म्हटल्यानेही त्या समाजास राष्ट्रीयत्व येणार नाही. कारण त्या भावनेंत स्थायीकपणा नसल्यामुळे, परंपरा उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नाहीं, व हिताहितसंबंधावरच त्या गुणांचा उपयोग आणि त्या भावनेचे अस्तित्व असल्यामुळे, हिताहितसंबंध पालटले म्हणजे त्यांची योजनाही पालटली. अशाप्रमाणे त्या गुणांतला उदात्तपणा निघून जातो.