पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय शिक्षण. करितां काढलेले इंग्रजी शिक्षणच असते; कारण देश, देशाभिमान आणि राज- कीय झगड्यास योग्य अशा कांही मनोवृत्तींस प्रेरक अशा गोष्टी एवढ्याने कांहीं राष्ट्रीयत्व होत नसतें. कारण, देश आणि देशाभिमान या सामान्य शब्दांनी झाल्यास फार झालें तर त्यागबुद्धि उत्पन्न होऊं शकेल, परंतु अंतःकरणाची 'विशिष्ट तऱ्हेची मूर्ति बनूं शकणार नाही. आणि अशा तऱ्हेची मूर्ति बनणें, यांतच राष्ट्रीयत्व आहे. आमच्या राष्ट्रीयत्वाच्या स्वरूपाविषयीं हल्ह्रीं इतका गोंधळ होऊन गेला आहे कीं, जो हिंदु म्हणावयास तयार असेल तो हिंदु, असली त्या राष्ट्रीयत्वाची व्याख्या करण्यापर्यंत मजल येऊन पोहोंचली. ज्यांनी राष्ट्रीय शिक्षण द्यावयाचें, त्यांच्याच जवळ अशा रीतीनें राष्ट्रीयत्वाचा अभाव ●असल्यामुळे, राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा म्हणजे इंग्रजी शिक्षणपद्धतीच्याच सुधारलेल्या आवृत्ति होणें साहजिक आहे. एवढ्याकरितां राष्ट्रीयत्व म्हणजे काय हे आधी पाहूं, आणि मग त्याचे शिक्षण कसे दिले जावें याचा विचार करूं. ७८ इंग्रजी शिक्षणाच्या योगानें निःसत्त्वता येऊन अनेक उत्कृष्ट गुणांची हानि होते, ती होऊं नये म्हणून देश, या सामान्य शब्दानें आजकाल वाङ्मयांत अट्टाहास चालविला आहे. देश हा इतका सामान्य शब्द आहे की जर तत्सं- बंधीं गुणसंस्कारांची विशिष्ट मूर्ति तयार नसेल, तर तो मनुष्याच्या अंतःकर •णास उद्बोध करूं शकणार नाहीं. इतर देशांतील इतिहास पाहिला तरी देखील अर्से दिसतें कीं, ज्यास कांहीं संघटनात्मक कार्य करावयाचें आहे, त्यास वि शिष्ट गुणसंस्कारांचीच मूर्ति लोकांपुढे मांडावी लागते. आणि देश या नांवांत जी एक जादु आहे असे वाटतें,तिचा निष्कर्ष कोणच्या तरी एका जनसमूहाच्या ठिकाणीं आत्मबुद्धि आणि तत्प्रीत्यर्थ स्वार्थत्यागाची तयारी या दोन उदात्त भावनांत दिसून येतो; व त्यांच्या योगानें जेथें कोणच्याही तऱ्हेचें प्रतिकारकार्य कराव-

  • ´ याचा अर्थ मात्र असा नाहीं की, हल्लीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था

प्रशंसनीय नाहींत. दगडापेक्षां वीट केव्हांही मऊच असणार व शिक्षण ध्यावयाचेंच म्हटले तर राष्ट्रीय शाळेत घेणेंच जास्त हितावह असणार आणि तेथेंच तें घेतले पाहिजे हें तर उघड आहे. न निंदा निंदितुं अपि तु विधेयं स्तोतुं ' या न्यायानें वरील लिहिणें आहे.