Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हल्लीचें राष्ट्रीय शिक्षण. राज्याचा व संस्कृतीचा हल्ला परत फिरविण्याकरतां झगडा सुरू केला, त्यांची पिढी बाहेर पडली. तेव्हां हा दोत्र इंग्रजी शिक्षणाचा म्हणजे अर्थातच निवळ • शाळाखात्याचा नाही. इंग्रजी शिक्षणाविरुद्ध ज्या वेळेस ओरड करण्यांत येते, ती वस्तुतः सभोवतालच्या वातावरणांत खचून भरलेल्या इंग्रजीपणामुळे जें हजारों प्रकारानें • इंग्रजी शिक्षण मिळत असते, त्याविरुद्ध नसून, शिक्षण खात्याकडून मिळणाऱ्या शिक्षणपद्धतीविरुद्ध असते. इंग्रजी शिक्षण जर वाईट असेल, तर वातावरणांत जेथे तेथे भरून राहिलेल्या इंग्रजी संस्कृतीस उडवून दिले पाहिजे, अथवा कांहीं काल तसें साधणें शक्य नसल्यास, निदान ती संस्कृति आमच्या अंतःकरणांवर वाटेल तो परिणाम करणार नाहीं, व तिच्या अनुरोधानें आमच्या आयुष्यास वळण लागणार नाही, असा कांहीतरी पक्केपणा आमचे ठिकाणी उत्पन्न केला पाहिजे. ज्याला आज राष्ट्रीय शिक्षण म्हणतात, त्याचा आणि शिक्षणखात्यातील शिक्षणाचा तुलनात्मक विचार केल्यास, दोघां- मध्ये इतकाच फरक आढळून येतो की राष्ट्रीय शाळेतून विशेषपणा दाख विण्याकरितां धंदे शिक्षणाचा एक धूमकेतु तिला जोडलेला असतो; व सभांना वगैरे जाण्याची आणि कांहीं चळवळींत प्रत्यक्ष भाग घेण्याची त्यांना मुभा असते. व कदाचित् देशी भाषेच्या उपयोगामुळे अभ्यासक्रम थोडा सुगम होत असेल. पण एवढ्यामुळे त्यांत राष्ट्रीयत्व अशा दृष्टीनें कांहीं मोठासा विशिष्टपणा येतो असें नाहीं. माहितीच्या दृष्टीने पाहिले तर दोनही शाळांतील विद्यार्थ्यांना सारखीच माहिती असते, आणि राजकीय कार्यक्रमांत एकास प्रत्यक्ष भाग घेतां आला नाहीं तरी इष्टानिष्ट परिणाम दोघांवरही सारखेच आढळून येतात. राष्ट्रीय शाळेत कांहीं काळ घालवून पोटापाण्यास लागलेला, आणि इंग्रेजी शिक्षणांतून बाहेर पडलेला अशा दोघांच्याही शीलांत व जीवन- क्रमांत असा कोणचाच फरक आढळून येत नाहीं कीं, ज्यामुळे त्यांच्या भिन्नभिन्न खाणी उमटून पडतील, जो कांहीं फरक राहतो तो शिक्षण संस्का रांचा नसून पोटापाण्यांच्या साधनांचा जो अवश्य परिणाम जीवावर होतो, त्याचा असतो. • याचें कारण असे दिसून येतें कीं, ज्यास राष्ट्रीय शिक्षण म्हणून म्हणण्यांत येतें तें वस्तुतः राष्ट्रीय नसून कांहीं गैरसोयी दूर करण्या-