पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ राष्ट्रीय शिक्षण. सरणीने हा प्रश्न वराचसा सुटण्यास मदत होत असली, तर ज्या त्यांच्या विचारांवरून याची मांडणी करतां आली, त्यांचेंच तें श्रेय आहे. याविषयीं त्यांचे प्रत्यक्ष असे वाक्य नसतांना हा केवळ अव्यापारेषु व्यापारही वाटण्याचें कारण नाहीं. कारण, देशामध्यें एक विशिष्ट विचार- परंपरा कायम राहावी, अथवा उत्पन्न व्हावी, हाच या चरित्राचा हेतु आहे; आणि जर हा विशिष्ट सांप्रदाय जोमदारपणानें वाढावयाचा असेल, तर त्याला अनुकूल अशा कोणत्या शिक्षणपद्धतीनें तो वाढेल, हेंही सांगणे योग्यच आहे; असो, इंग्रजी शिक्षणाचें जेव्हां परीक्षण सुरू झाले, तेव्हां त्यांतील एक दोष असा सांगण्यांत आला कीं, जेणेकरून राष्ट्रजागृती होईल, व जितकी त्यांच्या संबं धाची वस्तुस्थिति कळेल अशी माहिती त्यांत नसते. हिंदी लोकांच्या प्रत्येक गोष्टीस लाघव आणि तद्व्यतिरिक्त तेवढ्या सर्व गोष्टींस मुसलमान ग्रीक अथवा रोमन आणि युरोपिअन असल्या परंपरेनें उत्तरोत्तर गौरव द्यावयाचें अशी त्या शिक्षणाची तन्हा आहे; यामुळे याच्या उलट तें राष्ट्रीय शिक्षण, अशी कल्पना सररहा झालेली दिसते. इंग्रेजी शिक्षणाची तन्हा अशी मानभावी आहे, तर उघडच आहे, परंतु चांगला विचार केला तर, असे आढळून येईल कीं, विष्णुशास्त्र्यांच्या काळानंतर तरी, राष्ट्राचें घोडें त्यामुळे फारसें अडून बसले नव्हतें. इंग्रेजी शाळेत शिकणारा अगदी अत्यंत राजनिष्ठाचा कां मुलगा असेना, भोंवतालच्या परिस्थितीमुळे त्याला हे सहज कळत असे कीं, क्रमिक पुस्तकांतील माहिती खोडसाळ असून वस्तुस्थिति अगदीं भिन्न आहे. शिवाजी महाराजांस क्रमिक पुस्तकांत जरी सामान्य लुटारू म्हटलें तरी वस्तुतः त्यांची योग्यता कोणची होती, हें गेल्या पन्नास वर्षांतील विद्यार्थ्यांस तरी पूर्णपणें ठाऊक असतें. असे म्हणण्याचे कारण इतकेंच कीं तरुण माण- साचें ज्ञान केवळ क्रमिक पुस्तकांवरच अवलंबून नसतें, आणि सरकारने कितीही निर्बंध घातले तरी भोंवतालच्या वातावरणांतून सर्व तऱ्हेचे विचार त्यास मिळतच असतात. अशा स्थितीत क्रमिक पुस्तकांतील थोड्याशा शिक्ष- णानें त्यांचें गार्डे अडून राहतें, असें म्हणतां यावयाचें नाही. जर कांहीं नुक- सान झाले असेल तर ते इंग्रजी शिक्षणानें नव्हे; तर इंग्रजी संस्कृतीला दिपून गेल्यामुळे आम्ही जें धुपाटणें पालथें घातल्यासारखें केले त्याचा तो दोष आहे. याच इंग्रजी शिक्षणांतून, ज्यांनी राष्ट्रांत जागृती उत्पन्न केली, आणि इंग्रजी 0