पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय प्रवेश. ७५. करावा, अशी बुद्धि उत्पन्न झाली, आणि होतां होतां आजच्या घटकेस राष्ट्रीय शिक्षणाच्या नांवाखाली इंग्रजी विद्येस दूर सारण्याचा मनु येऊन ठेपला. परंतु व्यसनाच्या आहारी अतिशय पडलेल्या माणसाप्रमाणें, एकीकडे त्या शिक्ष- •णास शिव्या देऊन, राष्ट्रीय शिक्षण अशा शब्दानें अनिश्चित कल्पनांचा उद्गार करावा, आणि दुसरीकडे वेडेवांकडे तोंड करीत घशांत ओतलेल्या दारूप्रमाणे त्या शिक्षणाच्या अधिकाधिक पचनी पडावें, अशी असहाय स्थिति झाली आहे. तरुण पिढी हीच राष्ट्राची खाण आहे, या खाणीची जशा रीतीनें जोपासना केली जावी, तशाच रीतीने पुढील राष्ट्र तयार होईल, ही गोष्ट सर्वांस पटली आहे, परंतु मुख्य अडचण अशी येते की, आमचें राष्ट्रीयत्व म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय व ते कसे दिले जातें, यांच्या निश्चित कल्पनेचा अभाव आणि दुसरें, शिक्षणाचा आणि अन्नोदकाचा असलेला अपरिहार्य संबंध यामुळे कितीही ओरड झाली तरी, नवीन असें कांहींच शिक्षण मिळत नाहीं, आणि पाश्चात्य शिक्षणही दिवसेंदिवस कठीण होऊं लागले अशी स्थिति होऊन, कांहीं तरी एकच गोंधळ झाला आहे. अशा स्थितीत, या विषयाशी संबंध असलेले सारे प्रश्न नीट रीतीने सोडवून, त्याची कांही तरी निश्चित कल्पना करणें जरूर आहे, असे वाटून हा भाग हाती घेतला आहे. मात्र पूर्वीच्या कोणच्याही प्रकरणापेक्षां यांतील विचारांची जबाबदारी आमच्यावर जास्त आहे, कारण पूर्वीच्या प्रकरणांत आलेले सारे विषय बहुतेक जसेच्या तसे अण्णासाहेब यांच्या शब्दांतच मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांतील शब्द- रचना जरी आमची असली तरी, एकंदर प्रतिपादन हें बहुतेक सर्व त्यांचेंच आहे, व कित्येक ठिकाणी तर त्यांच्या शब्दांतच आहे. म्हणून त्याविषयीं कोणी कांहीं शंका काढली असतां आम्ही निःशंकपणानें अण्णासाहेब यांचेकडे बोट दाखवूं शकतों. तसें या ठिकाणी आम्हांस कानांवर हात ठेवतां येत नाहीत; कारण हा विषय इतक्या स्पष्टपणे त्यांच्यासमोर कत्रोंच निघाला नसल्यामुळे या विषयावर असे स्वतंत्र त्यांचे कांहीं उद्गार सांगतां येत नाहीत. परंतु यास जोडून असलेल्या इतर कित्येक विषयांवरील त्यांच्या उद्गारांवरून हा प्रश्न कसा सोडविला पाहिजे तें पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून यांत जुर कोठें चूक असेल, तर ती आमची आहे, आणि जर त्यांतील विचार-