Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय शिक्षण. The great thing in all education is to make our nervous system our ally instead of our enemy. We must make automatic and habitual, as early as possible, as many useful actions as we can, and as carefully guard against the growing into ways, that are likely to be dis- advantageous. The more details of our daily life we can hand over to the effo tless custody of autom&tion, the more our higher powers of mind will be set free for their own proper work. Do not pre: ch too much to your pupils, or abound in good talk in the abstract. Lie in wait rather for the practical opportunities, be prompt to seize those that pass, and thus at one operation get your pupils both to think, to feel, to do. The srokes of behaviour are what give the new set to the character and work the good habits into its or, anic tissue. Preach- ing and talking too much soon become in-effectual bore. सुप्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्री प्रो. जेम्स यांच्या वरील उताऱ्यांत अण्णा- साहेब यांच्या अथवा थोडक्यांत म्हणावयाचें म्हणजे आमच्या पूर्वपरंपरेतील शिक्षणपद्धतीचें रहस्यच सूत्ररूपानें सांगितले आहे. शिक्षण हाच राष्ट्रीय जीवनाचा आत्मा आहे, याविषयीं कांहींच वाद नाही. आणि ' राष्ट्रास शिक्षण ' अशी जी देशाच्या दुर्दशेवरील उतारा म्हणून 26 द्या, राष्ट्रास शिक्षण द्या, ओरड करण्यांत येते, तीही यथार्थच आहे. परंतु हें शिक्षण म्हणजे काय, आणि तें द्यावयाचें कसें हाच काय तो वैचित्र्याचा प्रश्न आहे. पाश्चात्य संस्कृ- तीशी संबंध आल्याबरोबर तिच्या झगझगाटानें दिपून जाऊन पाश्चात्य लोकांचें ज्ञान, त्यांच्या विचारसरणी, आणि त्यांची शास्त्रे यांत प्रावीण्य मिळविणें एवढाच शिक्षणाचा अर्थ केला जात होता. त्यानंतर हळू हळू त्या शिक्षणाचा स्वतःच्या संस्कृतीच्या दृष्टीनें व राष्ट्रीय दृष्टया असलेला घातुकपणा लक्षांत येऊन त्यांतील चांगले तेवढे घ्यावें व आमच्यांतील कांहीं घेऊन निराळाच मसाला तयार