Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक सूचना. ७३ हे उघड आहे. तरी पण एक गोष्ट मात्र ते नेहमी मोठ्या कळकळीने सांगत, आणि ती उघडपणें तशीच लोकांस सांगणें अवश्य आहे असे आम्हांसही वाटतें. " देशाचा उद्धार कधीही होवो, आज देशाची स्थिति कितीही सुव्यव- स्थित व शांत असो, आणि लोकांत उन्नति व ऐक्यभाव कितीही झालेला दिसो, त्याच्यावर म्हणजे विशेषतः हिंदु लोकांवर असा एक काळ लौकरच येणार आहे कीं, त्याच्याकरितां आतांपासून जर तरतूद केली नाही, तर त्यांना ' दे माय धरणी ठाय' होऊन जाईल. यांतून केवळ परमेश्वराच्या कृपेनेंच पार पडणें शक्य आहे. त्या काळांत 'जीव मुठीत धरून ' कसेबसें तरी जगतां येईल, ( अर्थात् राष्ट्र या रीतीनें ) अशी सोय करणे भाग आहे; व स्वतःच्या श्रद्धावुद्धथनुरूप कांहीं तरी त्याकरतां इमाने इतबारें प्रत्येकानें केले पाहिजे, मग तीं नमस्कारानें शरीर कमावण्यासारखी एकादी दृश्य, अथवा ईश्वरास कळकळीने प्रार्थना करण्यासारखी एकादी अदृश्य गोष्ट असो, " असें तें सांगत असत. या विषयीं कांहीं जास्त लिहितां येत नाही, परंतु जगांतील एकंदर राजकारण 'तंजीव' व 'तघलीव' यासारख्या चळवळी, आणि भयसूचक घंटेसारखी पुस्तकें, इत्यादि सर्व प्रकार लक्षांत घेतां व या दिशेने कांहीं तरी केले पाहिजे, असे विचारी लोकांस जे वाटू लागले आहे, तें पाहिलें म्हणजे या उपदेशाचे महत्त्व लक्षांत येतें.